मंगेश येवले@Navapur Live लॉकडाऊन मध्ये होरपळलेल्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व्यापारी संतप्त
नवापुरात दुकानदारांना सूट दिल्या नंतर कारवाई व्यापारीं मध्ये पुन्हा असंतोष
जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊन च्या तिसऱ्या टप्यात शासनाच्या निर्देशा नुसार दुकाने उघडण्यास सूट दिली होती नवापूरात सूट दिल्याने दुकाने दोन दिवसा पासून दुकाने सुरू केली होती सामान्य दुकानदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले हिते आज सकाळी मुख्याधिकारी नगर परिषद कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाच्या ताफ्या ने दुकानदार सोशल डिस्टनसिंग चे पालन करत नसल्या मूळे 10 ते 11 दुकान मालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे समजते तर काही दुकानदारांनी अधिकारी पोलीस गाड्याचा ताफा बघताच आपली दुकाने बंद करून घेतली होती आशा दुकानदारांना पुन्हा दुकाने उघडायला लावून कारवाई करण्यात आल्याने अगोदरच लॉकडाऊन मूळे आर्थिक नुकसान होऊन होरपळलेल्या नवापूर शहरातील व्यापारी मध्ये असंतोष पसरला आहे दुकाने ऊघडण्याची 8 ते12 वाजे पर्यन्त परवानगी दिल्यावर या वेळेच्या आत होत असलेल्या दंडात्मक कारवाईने आश्चर्य व्यक्त केले जात आहे
Comments
Post a Comment