मंगेश येवले@ Navapur Live कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या खांडबारा येथील 11 लोकांना केले कोरेन्टीन खांडबारा गाव पुढील तीन दिवस सम्पूर्ण लॉकडाऊन !
नंदुरबार शहरात पुन्हा 80 वर्षाच्या आजीला कोरोनाची लागण झाल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून आता पर्यंत एकूण कोरोना पोजिटिव्ह रुग्ण संख्या 21 त्यातील एकाचा मृत्यू तर 5 लोकांना उपचारा नंतर डिस्चार्ज देण्यात आल्याने एकूण 15 रुग्ण जिल्हारुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी दिली आहे
नंदुरबार तालुक्यातील आष्टे येथील 68 वर्षीय कोरोना पोजिटिव्ह महिलेचा खांडबारा कनेक्शन उघड झाल्याने नवापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे नवापूर तालुका प्रशासनाने खबरदारी म्हणून कोरोना संसर्ग चे नातेवाईक जावई , मुलगी ,नात व इतर 11 व्यक्तींना खांडबारा येथील नंदुरबार रोड वरील शनी मंदिर समोरील शासकीय मुलांचे वसतिगृहात शासकीय कोरेंनटाईन सेंटर मध्ये कोरेन्टीन करण्यात आले आहे
आज पासून तीन दिवस सम्पूर्ण खांडबारा शहर लॉकडाऊन करण्यात आले असून कोणीही घरा बाहेर पडू नये वाहन किंवा पायी फिरण्याचा प्रयत्न करू नये फिरणार्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे रात्री 11 वाजे पासून नवापूर तहसीलदार उल्हास देवरे BDO नंदकुमार वाळेकर वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश वळवी विसरवाडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश न्याहदे आदीनी गावात पूर्ण पणे लक्ष केंद्रित केले असून सम्पूर्ण गाव सेनेटाइझ फवारणी करण्यात येत असल्याची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली
Comments
Post a Comment