मंगेश येवले @Navapur Live नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना योद्धा ची कोरोना ला मात जिल्हाची कोरोना मुक्ती कडे वाटचाल ! 17 रुग्ण कोरोना मुक्त

कोरोना योद्ध्याची कोरोनावर मात

नंदुरबार दि १७- कोरोना प्रतिबंधासाठी कर्तव्य बजावताना कोविड_१९ चा संसर्ग झालेल्या नंदुरबार येथील पोलीस कर्मचारी संसर्गमुक्त झाल्याने त्याला फुलांच्या वर्षावात जिल्हा रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी त्याचे स्वागत केले.

यावेळी परीक्षाविधीन   सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर.डी. भोये, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, पोलीस उपअधीक्षक (गृह ) सिताराम गायकवाड, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, डॉ. के.डी. सातपुते ,डॉ. राजेश वसावे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जे.आर. तडवी ,गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले ,लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे शिरीष जाधव, शहर पोलीस निरीक्षक सुनील नंद्वाळकर आदी उपस्थित होते.

या कर्मचाऱ्याचा तिसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. रुग्णालयातून बाहेर पडताना पोलीस दलाने केलेल्या स्वागताने आनंद झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. रुग्णालयात चांगले उपचार मिळाले असेही ते म्हणाले. जिल्ह्यात 17 रुग्ण संसर्गमुक्त झाले असून इतर 2 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

महेंद्र पंडीत, पोलीस अधीक्षक- पोलीस जोखीम पत्करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत आहेत. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. अनावश्यक बाहेर फिरणे टाळावे.

Comments

Popular posts from this blog

नवापूर-सोलापूर हुन आलेल्या 11लोकांना केले कोरेनटाईन

गुजरात पोलिसांची कारवाई नवापुरचे तीन अटक 9लाखाच्या मुद्देमाल जप्त (विमल गुटखा तमाखू आणि वाहन)

Mangesh Yeole @ Navapur Live News 27/07/2020