मनागेश येवले @ Navapur Live धक्कादायक नंदुरबार जिल्ह्यात एकाच दिवशी 9 रुग्ण कोरोना पोजिटिव्ह
*नवापूर- नंदुरबार जिल्ह्यात धक्कादायक बातमी एकाच दिवशी 9 कोरोना पोजिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासना कडून हाय एलर्ट*
नंदुरबार जिल्ह्या कोरोना मुक्त झाल्याचा 24 तासातच रजाळे येथील रुग्ण पोजिटिव्ह असल्याचे समजल्याने प्रशासन हादरले होते
रजाळे येथील रुग्णाची पार्श्वभूमी असलेल्या व मुंबई येथून परतलेल्या एकाच कुटुंबातील 6 लोकांना कोरोना ची लागण झाल्याचं निष्पन्न झाले आहे रजाळे येथील रुग्ण तीन दिवस अगोदर उपचार घेऊन आल्याचे समजल्याने प्रशासना कडून नंदुरबार शहरातील एक नामांकित खाजगी रुग्णालय सील करण्यात आले आहे
रजाळे येथील रुग्णाच्या कुटुंबातील 6 जिल्ह्यारुग्णालयातील दोन कर्मचारी तर धुळे येथुन नंदुरबारला आलेल्या एका रुग्णाचा चाचणी अहवाल कोरोना पोजिटिव्ह असल्याची माहिती सोशल मिडियाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी दिली आहे
एकूण कोरोना पोजिटिव्ह रुग्णाची संख्या 9 झाल्याने प्रशासना कडून हाय एलर्ट जाहीर करण्यात आला आहे लोकांनी सोशल डिस्टन सिंग पाळणे व मास्क लावणे तसेच कामा व्यतिरिक्त बाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासना कडून करण्यात आले आहे
Comments
Post a Comment