गुजरात पोलिसांची कारवाई नवापुरचे तीन अटक 9लाखाच्या मुद्देमाल जप्त (विमल गुटखा तमाखू आणि वाहन)
*नवापूर- गुजरात पोलिसांच्या कारवाईत नवापूर चे तीन अटकेत*
गुजरात येथील निझर गावात महाराष्ट्रात बंदी असलेल्या विमल पान मसाला भरलेल्या पिकअप वाहन 9लाखाच्या मुद्देमाल सोबत नवापूर येथील तीन लोकांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे
नवापूर तालुक्याच्या सर्व सीमा सील केल्या असतांना हे वाहन कोणत्या छुप्या मार्गाने गेले असेल ते संशोधनाच्या विषय आहे
अटक झालेले ड्रायव्हर आणि इतर आरोपी नवापुरचे असल्याने प्रतिबंधित असलेले विमल गुटखा तंबाखू वाहनात सापडल्याने नवापूर गुटखा, तंबाखू तस्करी चे कनेक्शन तर नाही ना याची शँका उपस्थित झाली आहे गुजरात पोलिसांनि कोरोना विषाणू प्रसार रोखण्या साठी जिल्हा तसेच अन्य राज्यातील वाहन तसेच व्यक्ती प्रवेश बंदी केलेली होती जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त कोणत्याही सामान वाहतुकीची परवानगी नसतांना गुजरात पासिंग असलेली पिकअप वाहन जवळजवळ 9 लाख रुपये किमतीच्या मुद्देमाल सहित महाराष्ट्रातील नवापूर येथील तीनआरोपीना अटक झाली असून त्यांच्या वर डिजास्टर मॅनेजमेंट ऍक्ट नुसार कारवाई करण्यात आल्याने आरोपी नवापूर चे असल्याने विमल गुटखा तस्करी संचारबंदी काळात ही होत आहे की काय ? या बाबत उलट सुलट चर्चा रंगत आहेत
Comments
Post a Comment