मंगेश येवले@Navapur Live लॉकडाऊन मध्ये कोरोना मूळे नाही भूकमरी ने घेतला जीव
.
शिवपुरी---- -सुरत (गुजरात) इथल्या कापड मिलमध्ये काम करत होते. लॉकडाऊनमध्ये मिल बंद झाली. बेरोजगार झालेले हे दोघे लाचार होऊन उपाशीपोटी ट्रकमध्ये बसून आपल्या गावी परतत होते. रस्त्यात थकवा, दिहायड्रेशन आणि उपाशी असल्याने एकाची तब्येत बिघडली. त्याला ताप चढला. चक्कर यायला लागली. उलट्या व्हायला लागल्या.
कोरोनाच्या अफवेने ट्रकमध्ये बसलेल्या इतर मजुरांनी त्याला जबरदस्तीने ट्रकमधून खाली उतरवले. त्याच्यासोबतचा मजूरही मित्रासाठी खाली उतरला.
रस्त्यावरुन जाणाऱ्या गाड्यांना रडत रडत त्याने मदत मागितली. एका भल्या माणसाने त्याला दवाखान्यात पोहोचवले. पण तोपर्यंत त्याची तब्येत इतकी बिघडली होती की दवाखान्यात त्याला वाचवता आले नाही.
मरणारा मजूर हिंदू होता आणि अंतिम क्षणापर्यंत त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणारा मजूर याकूब !
हा बंधुभाव आहे आणि हीच मानवता आहे. आपली व्यवस्था त्याचाच खून करुन द्वेष पेरत आहे.
Comments
Post a Comment