मंगेश येवले @ Navapur Live *सोशल डिस्टनसिंग चे पालन न करणाऱ्या बुद्धीजीवी लोकांना मुक्या जनावरांनी दिला संदेश* नंदुरबार जिल्ह्यासाठी दिलासा दायक 5 रुग्ण कोरोना मुक्त
नंदुरबार जिल्ह्यात कोरोना पोजिटिव्ह रुग्णांची संख्या 19 झाली आणि जिल्ह्यात खळबळ उडाली होती दोन दिवसात पाच रुग्णांचा योग्य उपचारा मुळे स्वेब तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने नंदुरबार जिल्ह्या साठी दिलासादायक बाब आहे
दि 6 रोजी नंदुरबार येथील 4 रुग्ण आणि आज शहादा येथील एका 52 वर्षीय इसमाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे आता जिल्ह्यात 19 रुग्ण पैकी 1 मृत्यू झाला होता तर 5 लोकांना उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला असून आता रुग्णांच्या संख्येत झालेली घट नंदुरबार जिल्हा प्रशासन व नागरिकांसाठी आनंदाची बाब आहे परंतु नागरिकांनी दक्षता घेण्याची आवश्यकता असून बऱ्याच ठिकाणी सोशल डिस्टनसिंग चे पालन होत नसल्याने खूप चिंतेची बाब आहे नवापूर शहरात मुक्या जनावरांनी बुद्धीजीवी लोकांना सोशल डिस्टनसिंग कसे असते दाखवायचा प्रयत्न केलेला दिसून आला स आहे तो अचूक क्षण आमच्या प्रीतिनिधी नि टिपला आहे ह्या मुक्या जनावरांनी साऱ्या जगाला जणू काही संदेश दिला आहे
Comments
Post a Comment