*Breking News* *Navapur Live News* *खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सहकार्य करावे- डॉ.राजेंद्र भारुड* *जिल्हाधिकरी कार्यालयात बैठक सम्पन्न* नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 27 : कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी आणि बाधित व्यक्तिंवर उपचार करण्यासाठी प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या प्रयत्नात खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात वैद्यकीय व्यावसायिकांच्या प्रतिनिधीसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार राजेश पाडवी, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, अतिरिक्त शल्य चिकीत्सक डॉ.कांतराव सातपुते, डॉ.राजेंद्र चौधरी,आयएमएचे डॉ.शिरीष शिंदे, दिपक पटेल, राकेश पटेल आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, अधिकाधीक व्यक्तिंचे स्वॅब घेतले जावेत यासाठी नंदुरबार येथे चार आणि शहादा येथील दोन ठिकाणी स्वॅब घेण्याची सुविधा करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. वैद्यकीय व्यावसायिकांनी अशा जागा सुचविल्यास व लक्षणे असलेल्या रुग्णांना निश्चित वेळी त्याठिकाणी स्वॅब देण्यासाठी पाठविल्यास कमी वेळेत बाधितांबाबत माहिती ...
Comments
Post a Comment