मंगेश येवले@Navapur Live 20 ते 25 मजुरांचा परिवार सहित नवापुरात प्रवेश धोक्याची घंटा ! मजुरांची आरोग्य तपासणी करा माजी नगराध्यक्ष रमला भाई राणा यांची मागणी
*नवापूर शहरात आरोग्य तपासणी न करताच मजुरांना प्रवेश धोक्याची घंटा*
मंगेश येवले @Navapur Live
लॉकडाऊन 03 नंतर पप्रप्रांतीय मजुरांची घर वापसी सुरू झाली आहे गुजरात राज्यातील हजारो मजुरांना तपासणी न करताच प्रवेश देण्यात येत असल्याने कोरोना विषाणू संसर्ग वाढण्याची नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे
लॉकडाऊन चा तिसरा टप्प्यात प्रवेश झालेला आहे आता पर्यंत परराज्यात अडकून पडलेले मजूर आज मिळेल त्या साधना ने अथवा पायी आपला प्रवास सुरु केलेला आहे परंतु नवापूर शहर सीमावर्ती भागात असल्याने अनेक राज्यातील मजूर सीमा तपासणी नाका बेडकी नवापूर मार्गे जात आहेत तेथे तपासणी साठी यंत्रणा नसल्याचे दिसून येत आहे
:- गुजरात राज्यात मजुरीसाठी गेलेल्या मजुरांना गुजरात सरकारने गेल्या तीन दिवसापासून नवापूर तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 सीमावर्ती भागात येऊन सोडायला सुरुवात केली होती. कालपासून गुजरात राज्यातून परत येणाऱ्या मजुरांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामध्ये पायी प्रवास, मोटरसायकल, ट्रॅक्टर, ट्रक, लक्झरी बस, खाजगी वाहने अशाप्रकारे मिळेल त्या वाहनाने मजुरांनी आपल्या घरी परत जाण्यासाठी प्रवास सुरू केला आहे. विशेष म्हणजे हजारोंच्या संख्येने येणाऱ्या या मजुरांची सीमावर्ती भागात कोणतीही तपासणी केली जात नाही. नवापूर शहरातील शासकीय विश्राम गृह मागील वस्तीत आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास ट्रक मधून नवापूर स्टेशन रोड कडील वस्तीत 20 ते 25 परिवरा सहित मजुरांना तपासणी विना प्रवेश दिला जात असल्याचे सांगत नवापूर नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष रमला भाई राणा यांनी आलेल्या मजुरांची आरोग्य तपासणी करण्याची मागणी केली आहे
This is very serious issue, Government should not take it lightly.Because it will not only harm that workers but also people living there. Before it become worst government should take preventive measures
ReplyDelete