नवापूर - नवापूर पोलिसांची कारवाई 50 लाखाचा मुद्देमाल तंबाखू गुटखा जप्त
*नवापूर- नवापूर पोलिसांची मोठी कारवाई तंबाखू जन्य पदार्थ 50 लाखाचा मुद्देमाल जप्त*
नवापूर पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून नवापूर पिंपळनेर चौफुली जवळ ट्रक ची तपासणी केली असता महाराष्ट्रात बंदी असलेला विमल तंबाखू गुटखा आढळून आला आहे
ट्रक क्र MH 31GB 8837 हा जीवनावश्यक वस्तू वाहतुकीच्या नावा खाली महाराष्ट्रात बंदी असलेला विमल तंबाखू गुटखा तांदुळाच्या चुरीच्या आड लपवलेला आढळून आला सदर ट्रक आणि मुद्देमाल एकूण 50 लाख रु किमतीचा साठा जप्त केला आहे सदर कारवाई पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलिस अधिक्षक चंद्रकात गवळी,उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनात नवापूर पोलीस निरीक्षक विजययसिंग राजपूत सहाययक पोलीस निरीक्षक दिगम्बर शिंपी , धीरज महाजन आणि टीम ने केलेल्या कारवाई ने पुन्हा गुटखा तस्करी चे मोठे रॅकेट असल्याची बाब उघड झाली आहे गेल्या आठवड्यात गुजरात पोलिसांनी आयशर टेम्पो आणि पिकअप मध्ये होत असलेली तस्करी उघड झाली होती महाराष्ट्र जीवनावश्यक कायदा 2005 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून चालक आणि क्लिनरला ला अटक करण्यात आली असून तपास सहाययक पोलीस निरीक्षक धीरज महाजन आणि सहकारी करत आहेत
Comments
Post a Comment