मंगेश येवले@Navapur Live नवापूर नगर पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तब्ध
नवापूर- लॉकडाऊन चा तिसरा टप्प्यात नवापूर शहरात परिस्थिती सामान्य दिसत आहे नगर पालिका प्रशासना कडून शहरात निर्जंतुकीकरण करण्याचा कामाला ब्रेक लागलेला आहे जणू काही नवापुरात कोरोना विषाणू प्रादुर्भाव होणारच नाही हा भ्रम नगर पालिका प्रशासनाला झालेला दिसत आहे तर नगरसेवक जणू काही शहरात आहेत की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे काही भागात रस्त्याचे काम सुरू करून धन्यता मानण्याऱ्या नगरसेवक ठेकेदारांच्या मदतीला धावून जातांना दिसत आहेत कोरोना विषाणू ची गंभीरता कोणालाच दिसत नाही नगर पालिका क्षेत्रात खरेदी साठी नागरिक खेड्या पड्यातून इतर शहरातून स्थलातरीत मजुरांचे नवापूर शहरातून होणारे मार्गक्रमण करत आहेत त्या साठी शहरात भाजीपाला बाजार, लाईट बाजार
मेंनरोड , शहरातील अनेक कॉलनी मध्ये रोज सेनेटाइझ फवारणी अत्यावश्यक असतांना कोठेही प्रामाणिक कामे दिसत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत
पालिका प्रशासन आणि नगरसेवकांनी जणू काही नवापूर ह्या महामारी पासून जिकले असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करत आहे सुदैवाने आज नवापूर तालुक्यात कोरोना ला थारा मिळालेला नाही परंतु वेळ महत्वाची आहे
Comments
Post a Comment