ममंगेश येवले@ Navapur Live लॉकडाऊन 04 मध्ये अधिक शिथिलता मिळण्याची शक्यता!राज्य सरकार
लॉकडाउन कालावधी चौथा जवळपास निश्चित आहे. महाराष्ट्रामध्ये कोविड-19 रुग्णसंख्या मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव, औरंगाबाद, सोलापूर आणि नागपूर या प्रमुख शहरात वाढताना दिसतच आहे. ही प्रमुख शहरं रेड झोन क्षेत्रात येत असून या शहरांमध्ये प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अटी शिथील न करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.
मात्र, शहरातील काही भागांमध्ये जिथे रुग्ण आढळले नाहीत अशा भागांमध्ये सूट देण्याचा जवळपास निर्णय राज्य सरकार घेत असल्याचं समजतं आहे. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात लोकं शहरी भागातून ग्रामीण भागात स्थलांतर करत आहेत. अशा काळात ग्रामीण भागांमध्ये सुद्धा अधिक कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे
Comments
Post a Comment