मंगेश येवले@ Navapur Live महाराष्ट्र राज्य सरकार लॉकडाऊन दरम्यान लोकांच्या समस्या सोडवण्यात निष्फळ - भारतीय जनता। पार्टी नवापूर यांचे नवापूर तहसीलदार यांना निवेदन!

नवापूर ;-ता 19
कोरोणा या विषाणूच्या वाढत्या गंभीर संकटाला राज्य सरकारने लक्ष केंद्रित करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीने केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की  राज्यातील विशेषता मुंबईतील कोरोणा समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.राज्य सरकार निष्क्रिय झाले राज्यातील महाविकासाला लाँग सदर कोरोणा रोखण्यासाठी काम करण्यास भाग पाडण्याचा  हेतूने सदर निवेदन देत आहोत.

महाराष्ट्र व मुंबई कोरोणा समस्या हाताबाहेर गेलेली अशी स्थिती आहे .ज्यांना कोरोणाची लागण झाली आहे अशा रुग्णांना रुग्णालयात प्रवेश मिळणे आवश्यक झाले आहे. गावोगावी अनेक अडचणी आहेत .गरिबांचे व मजुरांचे तसेच शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत.
कोणत्याही प्रश्नावर राज्य सरकार आम भूमिका घेत नाही .केंद्र सरकारने चिंता करावयाची व राज्य सरकारने काहीच करायचे नाही अशी स्थिती आज आहे. सत्ताधारी आघाडी सरकार करुन केवळ राजकारण करणे ,प्रसिद्धी मिळविणे आणि सोशल मीडिया वरून अभूतपूर्व परिस्थिती निर्माण करणे चालू आहे.

नवापूर तालुक्यात लॉक डाऊन सुरू झाल्यापासून लोकांच्या रोजगार बंद आहे .काम नसल्यामुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र व राज्य सरकारचे एप्रिल व मे महिन्यात धान्य वाटप करताना अंत्योदय पीएचएच व केशरी शिधापत्रिका धारकांना मंजूर युनिटप्रमाणे धान्य दिले जात नसून ऑनलाइन लाभार्थ्यांना फिरवाफिरव केली जात असून लाभार्थी कोरोणा विषाणूचा गंभीर संकटाच्या काळात पुरवठा विभागाच्या भ्रष्ट कारभाराच्या बळी पडत आहे. तसेच नवापूर तालुक्यात लाँकडाऊनच्या पूर्वीचे आजार ग्रस्त लोक किडनी डायलेसीस यासाठी गुजरात राज्यात जात होते. त्यांना गुजरात सरकारने नकार दिल्याने त्यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांचाकडुन  मानसिक त्रास देण्यात आला तो अतिशय निंदनीय असून त्यांना वारंवार डायलेसिस करण्याकरिता नकार देण्यात आलेला आहे. या अभूतपूर्व संकटाच्या काळात राज्य सरकारला सर्वतोपरी साथ देण्यासाठी भाजप सरकारवर टीका टिप्पणी करणे टाळले होते.
तसेच  शेजारच्या अन्य राज्यांनी स्वतः पुढाकार घेऊन सर्वसामान्यांसाठी राज्याच्या तिजोरीतून पॅकेज जाहीर केले पण महाराष्ट्रात महा विकास आघाडी सरकारने अजूनही काही पॅकेज जाहीर केलेले नाही कोरोणासाठी शासकीय यंत्रणेच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याच्या ऐवजी त्यांचे  मनोधैर्य खच्ची होईल असा गाफीलपणा सरकारकडून सुरू आहे.

आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे राज्यातील जनतेच्या जीव टांगणीला लागला आहे हे हाता वरचे पोट असणाऱ्यांना रोज कधी सुरू होईल याची चिंता आहे. शेतकऱ्यांच्या कापूस व इतर तयार माल खरेदी विना पडून आहे .शेतकऱ्यांचे कर्ज माफी योजना अपूर्ण राहिल्याने त्यांची चिंता वाढून आहे .नोकरदारांना आपले काम कधी सुरू होईल याची काळजी आहे .उद्योग धंदा थंडावला आहेे. व्यापार ठप्प आहे आणि सर्वांनाच भविष्याची काळजी आहे अशा स्थितीत कोरोणामुळे राज्याचे संकट वाढत चालले आहे .कोरोणाच्या विळखा कसा सुटणार या काळजीने राज्यातील जनता कासावीस आहे अशा संकट स्थितीत महा विकास आघाडी सरकारकडून विशेष पॅकेज जाहीर केलें नसून जनतेच्या अडचणी दुर्लक्ष केले आहे म्हणून भारतीय जनता पार्टी शासनाचे जाहीर निषेध करीत आहे.निवेदनावर जि प सदस्य भरत गावित ,जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित, जिल्हा चिटणीस एजाज शेख, नगरसेवक महेंद्र सोनार, माजी दक्षता समिती सदस्य जयंतीलाल अग्रवाल, शहर उपाध्यक्ष स्वप्निल मिस्त्री शहर कोषाध्यक्ष सौरव भामरे, शहर सरचिटणीस हेमंत जाधव तालुका उपाध्यक्ष जितेंद्र अहिरे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Comments

Popular posts from this blog

नवापूर-सोलापूर हुन आलेल्या 11लोकांना केले कोरेनटाईन

गुजरात पोलिसांची कारवाई नवापुरचे तीन अटक 9लाखाच्या मुद्देमाल जप्त (विमल गुटखा तमाखू आणि वाहन)

Mangesh Yeole @ Navapur Live News 27/07/2020