मंगेश येवले @ Navapur Live वाकीपाडा गाव पुढील तीन दिवस लॉकडाऊन सम्पूर्ण व्यवहार बंद राहणार !
*नवापूर- नवापूर चा उंबरठ्यावर कोरोना वाकीपाडा गाव पुढील तीन दिवस लॉकडाऊन*
नवापूर शहराच्या लगत गुजरात राज्यातील ऊच्छल येथे एका27 वर्षीय युवतीच्या अहवाल कोरोना पोजिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे
युवतीच्या पार्श्वभूमी अहमदाबाद येथिल गोमतीपुर परिसरातून आलेली असल्याने तिला कोरेंनटाईन करण्यात आले होते युवतीचा अहवाल आज रोजी पोजिटिव्ह आला असल्याने महाराष्ट्र्र सीमे वर फक्त 300 मीटर अंतरावर असलेल्या वाकीपाडा गावातील सरपंच यांनी गाव सीमा सील करण्याचे काम सुरू केले आहे
नवापूर शहरातील व्यापारी उच्छल गावात थेट संपर्क येत असल्याने हाकेच्या अंतरावर असलेल्या नवापूर शहरात ही उच्छल येथील पोजिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे नवापूर तालुका प्रशासन हादरले असून उपाय योजना करण्याचे काम युद्ध स्तरावर सुरू करण्यात आले आहे
नवापूर शहराच्या सीमे लगत असलेले उच्छल येथील एक महिला आणि सोंनगढ येथील दोन पुरुषाचा अहवाल कोरोना पोजिटिव्ह आल्याने नवापूर लगत च्या सीमा नवापूर रेल्वेस्टेशन जवळील राजेश हॉटेल तसेच खाकर फळी ला जोडणारे रस्ते सील करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे
आज नवापूर तालुका प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर तसेच नगर परिषद मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी उच्छल येथील हनुमान फळी तसेच वाकीपाडा गावाला भेट देऊन युद्ध स्तरावर उपाययोजना सुरू केल्या आहेत पुढील तीन दिवस वाकीपाडा गाव सम्पूर्ण व्यवहार बंद राहणार असल्याची माहिती तालुका प्रशासनाने दिली आहे
Comments
Post a Comment