नंदुरबार कोरोना लेटेस्ट अपडेट
शहादा तालुक्यातील 62 वर्षाच्या पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा रुग्ण पूर्वीच्याच प्रतिबंधित क्षेत्रातील असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहादा तालुक्यातील हिंगाणे येथील एक (51 वर्षीय पुरुष) रुग्णाचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना 26 मे रोजी मृत्यू झाला होता. त्याचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता. उपचारादरम्यान आजाराची लक्षणे दिसत असल्याने त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना चाचणीसाठी दुसऱ्यांदा पाठविण्यात आला होता. दरम्यान 26 रोजी त्याचा मृत्यू झाला. आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 31 इतर व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
एकूण पॉझिटिव्ह 32
मृत्यू 3
बरे झाले 19
उपचार घेत असलेले 10
Comments
Post a Comment