Posts

Showing posts from May, 2020

मंगेश येवले@ Navapur Live विसरवाडी परिसरात फेक मेसेज मुळे पसरली अफवा

Image
*नवापूर- विसरवाडी परिसरात फेक मेसेज  मुळे पसरली अफवा* नवापूर तालुक्यातही विसरवाडी परिसरातील मांचा होंडा गावात   कोरोना पोजिटिव्ह रुग्ण सापडला असून तो सिव्हिल हॉस्पिटल मध्ये भरती आहे ही व्यक्ती मुंबई हुन 17-05-2020 ला आल्याचं सांगितलं जातं आहे ही व्यक्ती मुंबई ला पोलीस खात्यात काम करत असल्याची माहिती मिळाली आहे असा प्रकारचा मेसेज  सोशल मीडियावर  फॉरवर्ड करून अफवा  पसरवली जात असल्याची माहिती गट विकास नंदकुमार वाळेकर यांनी दिली असून नागरिकांनी आशा कोणत्याही अफवा ना बळी पडू नका असा कोणत्याही प्रकारचा रुग्ण आढळला नसून हा मेसेज फेक असल्याचं सांगितलं असून असा मेसेज टाकून अफवा पसरवणार्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल तसेच नागरिकांनी काळजी करण्याचं कोणतेही कारण असून शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे

मंगेश येवले @ Navapur Live मानस हॉटेल जवळ अपघात युवक जागीच ठार !

Image
*नवापूर- मानस हॉटेल जवळ अपघात युवक जागीच ठार*  नवापूर शहरा पासून 2 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय माहामार्ग क्र 6 मांनस हॉटेल जवळ मोटर सायकल अपघात झाला आहे  तापी जिल्ह्यातील व्यारा तालुक्यातील गिरिषभाई गामीत वय 35 ते 40 असलेला युवक मोटर सायकल ने प्रवास करत असताना मांनस हॉटेल जवळ अपघातात जागीच ठार झाल्या ची माहिती पोलीस सूत्रा कडून मिळाली असून अपघाता बाबत माहिती समजू शकली नाही नवापूर पोलिसांच्या मदतीने सदर व्यक्ती ला जिल्हारुग्णालयात  शव विच्छेदना साठी आणले असून त्यांच्या नातेवाईकांना कळवले असल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पवार यांनी दिली 

नंदुरबार कोरोना लेटेस्ट अपडेट

Image
शहादा तालुक्यातील 62 वर्षाच्या पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा रुग्ण पूर्वीच्याच प्रतिबंधित क्षेत्रातील असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहादा तालुक्यातील हिंगाणे येथील एक (51 वर्षीय पुरुष) रुग्णाचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना 26 मे रोजी मृत्यू झाला होता. त्याचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता. उपचारादरम्यान आजाराची लक्षणे दिसत असल्याने त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना चाचणीसाठी दुसऱ्यांदा पाठविण्यात आला होता. दरम्यान 26 रोजी त्याचा मृत्यू झाला. आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 31 इतर व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एकूण पॉझिटिव्ह 32 मृत्यू 3 बरे झाले 19 उपचार घेत असलेले 10 (जिल्हा रुग्णालय प्रशासनाची माहिती)

मंगेश येवले @ Navapur Live वाकीपाडा गाव पुढील तीन दिवस लॉकडाऊन सम्पूर्ण व्यवहार बंद राहणार !

Image
*नवापूर-  नवापूर चा उंबरठ्यावर कोरोना  वाकीपाडा गाव पुढील तीन दिवस लॉकडाऊन*   नवापूर शहराच्या लगत गुजरात राज्यातील ऊच्छल येथे एका27 वर्षीय युवतीच्या अहवाल कोरोना पोजिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे   युवतीच्या पार्श्वभूमी अहमदाबाद येथिल  गोमतीपुर परिसरातून आलेली असल्याने तिला कोरेंनटाईन करण्यात आले होते युवतीचा अहवाल आज रोजी पोजिटिव्ह आला असल्याने महाराष्ट्र्र सीमे वर फक्त 300 मीटर अंतरावर असलेल्या वाकीपाडा गावातील सरपंच यांनी गाव सीमा सील करण्याचे काम सुरू केले आहे    नवापूर शहरातील व्यापारी उच्छल गावात   थेट संपर्क येत असल्याने हाकेच्या अंतरावर असलेल्या नवापूर शहरात ही उच्छल येथील पोजिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे नवापूर तालुका प्रशासन हादरले असून उपाय योजना करण्याचे काम युद्ध स्तरावर सुरू करण्यात आले आहे    नवापूर शहराच्या सीमे लगत असलेले उच्छल येथील एक महिला  आणि सोंनगढ येथील दोन पुरुषाचा अहवाल कोरोना पोजिटिव्ह आल्याने नवापूर लगत  च्या सीमा नवापूर  रेल्वेस्टेशन  जवळील राजेश हॉटेल तसेच खाकर फळी ला जोड...

मंगेश येवले@Navapur Live अमन पार्क जवळ अज्ञात इसमाच्या मृत्यू

Image
नवापूर- अज्ञात इसमाच्या मृत्यू ने खळबळ* नवापूर शहरा लगत राष्ट्रीय महामार्ग क्र6 वर सकाळी 10 वाजता एका रहदारी कडून मिळालेल्या माहिती नुसार हायवे लगत अमन पार्क च्या गेट जवळ अज्ञात इसम पडलेला दिसला रहदारी व्यक्तीने नवापूर पोलिसात खबर दिली होती    नवापूर पोलिसांनी घटना स्थळी पाहणी केली असता सदर व्यक्ती मृत असल्याचे आढळले असून त्याला उपजिल्हारुग्णालयात शवविच्छेदना साठी आणण्यात आले आहे  अज्ञात मृत इसमाची ओळख पटलेली नसून भिक्षुक असल्याचे निर्शनात आले असून  पुढील तपास पो.को.पवार  करत आहे

मंगेश येवले @ Navapur Live नंदुरबार जिल्ह्यात 75 हजार मजुरांना काम मिळवून देण्याचे उद्दिष्ट --जिल्हाधिकारी

Image
*७५ हजार मजुरांना काम मिळवून देण्याचे उद्दिष्ट -जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड*  नंदुरबार दि.23 : करोनामुळे अनेक मजुंराचा रोजगार गेला असून अनेक मजूर हे जिल्ह्यात आपल्या मूळगावी परतल्याने त्यांच्यासमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या सर्वांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून  कामे उपलब्ध करुन देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत दिले.  बैठकीस सहायक जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा, तृप्ती धोडमिसे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुधीर खांदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी.एन.पाटील, कृषी उपसंचालक एम.एस.रामोळे उपस्थित होते.  डॉ.भारुड म्हणाले , मनरेगातून जिल्ह्यात 5 हजार 144 कामे सुरु असुन 41 हजार 157 मजूराना कामे उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या संख्येत अधिक वाढ करण्याचा प्रयत्न सर्व यंत्रणांनी करावा. जिल्ह्यातुन 75 हजार मजुरांना  रोजगार उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट असून त्यादृष्टीने प्रलंबित असलेली कामे त्वरीत सुरु करण्यात यावीत.  सध्या शेतीमजूरीची कामे ठप्प कमी असल्यामुळे मनरेगा अंतर्गत  कृष...

मंगेश येवले @Navapur Live रजाळे येथील पोजिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 5 लोकांचा शोध सुरू

Image
*नवापूर - रजाळे येथील रुग्णाच्या संपर्कातील  नवापूर तालुक्यात 5 लोकांचा शोध सुरू*  नवापूर तालुक्यासाठी ही धोक्याची घंटा आहे रजाळे येथील कोरोना पोजिटिव्ह रुग्णाची पार्श्वभूमी बघता प्रशासना कडून नवापूर तालुक्यातिल खांडबारा येथील 3 चिंचपाडा 1 तर नवागाव येथील 1 एकूण 5 लोकांचा शोध घेतला जात असल्याची माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली आहे    नवापूर तालुक्यातिल नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही परंतु काळजी घेण्याची गरज असून सोशल डिस्टनसिंग पाळणे अत्यंत आवश्यक  आहे नागरिकांनी कामा व्यतिरिक्त बाहेर पडू नये असे आवाहन तालुका प्रशासना कडून करण्यात आले आहे

मनागेश येवले @ Navapur Live धक्कादायक नंदुरबार जिल्ह्यात एकाच दिवशी 9 रुग्ण कोरोना पोजिटिव्ह

Image
*नवापूर- नंदुरबार जिल्ह्यात  धक्कादायक बातमी एकाच दिवशी 9 कोरोना पोजिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासना कडून हाय एलर्ट*  नंदुरबार जिल्ह्या कोरोना मुक्त झाल्याचा 24 तासातच रजाळे येथील रुग्ण पोजिटिव्ह असल्याचे समजल्याने प्रशासन हादरले होते      रजाळे येथील रुग्णाची पार्श्वभूमी असलेल्या व मुंबई येथून परतलेल्या एकाच कुटुंबातील 6 लोकांना कोरोना ची लागण झाल्याचं निष्पन्न झाले आहे रजाळे येथील रुग्ण तीन दिवस अगोदर उपचार घेऊन आल्याचे समजल्याने प्रशासना कडून नंदुरबार शहरातील एक नामांकित खाजगी रुग्णालय सील करण्यात आले आहे                         रजाळे येथील रुग्णाच्या कुटुंबातील 6 जिल्ह्यारुग्णालयातील दोन कर्मचारी तर  धुळे येथुन नंदुरबारला आलेल्या एका रुग्णाचा चाचणी अहवाल कोरोना पोजिटिव्ह  असल्याची माहिती सोशल मिडियाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी दिली आहे  एकूण कोरोना पोजिटिव्ह रुग्णाची संख्या 9 झाल्याने  प्रशासना कडून हाय एलर्ट जाहीर करण्यात आला आहे ...

मंगेश येवले @Navapur Live खांडबारा प्रतिनिधी- मनोज चौधरी *खांडबारा येथील 18 युवकांनी केले रक्तदान*

Image
*खांडबारा येथे रक्तदान शिबिर 18 युवकांनी केले रक्तदान*  कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासना कडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत समाजासाठी आपलंही काही देणं आहे आज देशावर आलेली कोरोना महामारी च्या संकटात रुग्णांना अत्यावश्यक वेळेस रक्ताची गरज भासते त्यावेळेस रक्त उपलब्ध व्हाहे या उद्देशाने खांडबारा येथील युवकांनी रक्तदान उपक्रम राबवला   आहे         नवापुर तालुक्यातील खांडबारा येथील पिनाकी टी स्टाल येथील ओपन स्पेस येथे रक्तदान शिबिर डॉ लालचंदानी यांचा मार्गदरशनाखाली आयोजित केले होते खांडबारा येथील  १८ युवकांनी रक्त दान केले यावेळी लैब टेक्नीशियन सुनिल भोई,खलील काजी,खांडबारा ग्रामपंचायत सदस्य शैलेश गावीत, जगदीश चौधरी, सामाजिक कार्यकर्ता पद्माकर शिंदे, अनिल शर्मा,नयन जयस्वाल, बबलु शर्मा, अल्ताफ अरेबियानी,मयुर चौधरी,दिनेश चौधरी,राहुल चौधरी,ललीत चौधरी,अनुपम परदेशी,प्रमे चौधरी,आदी उपस्थित होते

मंगेश येवले @Navapur live। नंदुरबार - नदुरबार तालुक्यातील रजाळे येथे पोजिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ

Image
नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथील 66 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा रुग्ण एक महिना मुंबई येथे मुलीकडे राहिल्याची प्राथमिक माहिती आहे. नागरिकांनी आजाराची लक्षणे दिसताच तपासणी करावी आणि बाहेरून आलेल्या व्यक्तींची माहिती प्रशासनाला द्यावी-जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचे आवाहन.   नवापूर शहरात ही अनेक नागरिक ,विद्यार्थी विद्यर्थींनी पुणे, मुंबई ,नाशिक इथून आलेले आहेत कृपया सर्वांनी स्वेच्छेने आरोग्य तपासणी करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नवापूर तहसीलदार राजेंद्र नजन यांनी केले आहे 

मंगेश येवले @ Navapur Live नंदुरबार जिल्ह्यात 22 मे पासून दुकाने 9 ते 5 पर्यन्त परवानगी तर जिह्यातर्गत बस 50% प्रवासी सेवा सुरू

Image
*नवापुर- व्यापारी साठी आनंदाची बातमी दुकाने  सकाळी 9 ते 5 वाजे पर्यन्त तर जिल्ह्यांतर बस सेवा 22 मे पासून*    नंदुरबार जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सदर  माहिती दिली आहेजिल्ह्यांतर्गत बससेवा 22 मे पासून सुरू होणार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचे आदेश   नंदुरबार दि.19 : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात जिल्ह्यात एकही कोविड संसर्ग असलेला रुग्ण नसल्याने 22 मे पासून जिल्ह्यांतर्गत 50 टक्के प्रवासी क्षमतेने बससेवा सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. ग्रामीण भागातील जनतेला या सुविधेचा लाभ होणार आहे. आंतरजिल्हा बससेवेबाबत शासनाकडून सूचना आल्यानंतर त्यानुसार स्वतंत्र आदेश काढण्यात येतील. औषधांची दुकाने आणि खाजगी रुग्णालयाये सुरू राहतील. टॅक्सी, कॅब आणि रिक्शा सुरू राहतील, तथापि केवळ वाहनचालक आणि इतर दोन प्रवासी नेण्यास अनुमती राहील. चारचाकी वाहनानेदेखील वाहनचालक व इतर दोन प्रवाशांना अनुमती असेल. दुचाकी वाहनावर केवळ चालकाला (एका व्यक्तीस) अनुमती असेल. सर्व प्रक...

मंगेश येवले@Navapur Live नंदुरबार कोविड 19 अपडेट

Image
#नंदुरबार #कोविड_19 अपडेट एकूण घेतलेले नमुने-1073 निगेटिव्ह अहवाल-1006 पॉझिटिव्ह अहवाल-21 (पैकी 2 मृत्यू) संसर्गमुक्त झालेले-19 रुग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटीव्ह रुग्ण-00 प्रलंबित अहवाल-41 #WarAgainstVirus

मंगेश येवले@ Navapur Live महाराष्ट्र राज्य सरकार लॉकडाऊन दरम्यान लोकांच्या समस्या सोडवण्यात निष्फळ - भारतीय जनता। पार्टी नवापूर यांचे नवापूर तहसीलदार यांना निवेदन!

Image
नवापूर ;-ता 19 कोरोणा या विषाणूच्या वाढत्या गंभीर संकटाला राज्य सरकारने लक्ष केंद्रित करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीने केली आहे. निवेदनात म्हटले आहे की  राज्यातील विशेषता मुंबईतील कोरोणा समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.राज्य सरकार निष्क्रिय झाले राज्यातील महाविकासाला लाँग सदर कोरोणा रोखण्यासाठी काम करण्यास भाग पाडण्याचा  हेतूने सदर निवेदन देत आहोत. महाराष्ट्र व मुंबई कोरोणा समस्या हाताबाहेर गेलेली अशी स्थिती आहे .ज्यांना कोरोणाची लागण झाली आहे अशा रुग्णांना रुग्णालयात प्रवेश मिळणे आवश्यक झाले आहे. गावोगावी अनेक अडचणी आहेत .गरिबांचे व मजुरांचे तसेच शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. कोणत्याही प्रश्नावर राज्य सरकार आम भूमिका घेत नाही .केंद्र सरकारने चिंता करावयाची व राज्य सरकारने काहीच करायचे नाही अशी स्थिती आज आहे. सत्ताधारी आघाडी सरकार करुन केवळ राजकारण करणे ,प्रसिद्धी मिळविणे आणि सोशल मीडिया वरून अभूतपूर्व परिस्थिती निर्माण करणे चालू आहे. नवापूर तालुक्यात लॉक डाऊन सुरू झाल्यापासून लोकांच्या रोजगार बंद आहे .काम नसल्यामुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र व राज्य सरका...

मंगेश येवले@ Navapur Live नंदुरबार जिल्ह्यात आधार केंद्र सुरू करण्यास परवानगी जिल्हाधिकारी

Image
जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र व आधार केंद्रे सुरू  नंदुरबार दि 18 : जिल्ह्यातील नागरिकांना विविध योजनाअंतर्गत लाभ घेण्यासाठी  अडचणी निर्माण होत असल्याने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण डॉ.राजेंद्र भारुड यांनी जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र व आधार केंद्रे सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व केंद्रातील उपकरणे नियमितपणे सॅनिटाईझर करावे. केंद्राच्या ठिकाणी सर्वांनी फेस मास्क/रुमाल वापरणे बंधनकारक राहील. केंद्राच्या ठिकाणी केंद्रचालक, ऑपरेटर यांना आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार सोशल डिस्टंन्सीग, साबणाने हात धुणे व सॅनिटाईझर वापर करणे बंधनकारक राहील.  केंद्रातील कर्मचाऱ्यांनी काम करतेवेळी नाक,तोंड, डोळे यांना स्पर्श करु नये.  केंद्रात येणाऱ्या सर्व नागरिकांनी व्यक्तीगत स्वच्छता पाळावी. केंद्रातील कर्मचाऱ्यांनी प्रत्येक वेळी बायोमॅट्रीक उपकरणांचे वापरानंतर स्वच्छ करावे. एखाद्या व्यक्तीस खोकला, ताप तसेच श्वास घेण्यास त्रास होत असल्यास अशा व्यक्तींस केंद्रावर येण्यापासून परावृत्त करावे. प्रत्येक केंद्रावर युआयडीएआ...

मंगेश येवले@ Navapur Live नंदुरबार जिल्हा कोरोना मुक्त

Image
*नवापूर- नंदुरबार जिल्हा कोरोना मुक्त*   नंदुरबार जिल्ह्यात एकूण 21 कोरोना बाधित रुग्ण आढळले होते  सर्व रुग्णाचे  जिल्हारुग्णालयात आयसोलेशन वार्ड मध्ये उपचार सुरू होते दुर्दैवाने दोन रुग्णाचा मृत्य झाला होता परंतु जिल्हा प्रशासन डॉक्टर्स नर्सेस पिरॅमेडिकल स्टाफ पोलीस प्रशासन यांनी जीवापाड मेहनत करून 21 पैकी 19 रुग्णांचा उपचार करून कोरोना मुक्त केल्याचं आज माहिती प्राप्त झाली आहे जिल्ह्यातील सर्व कोरोना योध्दा चे नवापूर तालुक्याचे आमदार शिरीष नाईक नवापूर नगर पालिका  नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी अभिनंदन केले आहे

मंगेश येवले @Navapur Live नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना योद्धा ची कोरोना ला मात जिल्हाची कोरोना मुक्ती कडे वाटचाल ! 17 रुग्ण कोरोना मुक्त

Image
कोरोना योद्ध्याची कोरोनावर मात नंदुरबार दि १७- कोरोना प्रतिबंधासाठी कर्तव्य बजावताना कोविड_१९ चा संसर्ग झालेल्या नंदुरबार येथील पोलीस कर्मचारी संसर्गमुक्त झाल्याने त्याला फुलांच्या वर्षावात जिल्हा रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी त्याचे स्वागत केले. यावेळी परीक्षाविधीन   सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर.डी. भोये, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, पोलीस उपअधीक्षक (गृह ) सिताराम गायकवाड, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, डॉ. के.डी. सातपुते ,डॉ. राजेश वसावे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जे.आर. तडवी ,गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले ,लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे शिरीष जाधव, शहर पोलीस निरीक्षक सुनील नंद्वाळकर आदी उपस्थित होते. या कर्मचाऱ्याचा तिसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. रुग्णालयातून बाहेर पडताना पोलीस दलाने केलेल्या स्वागताने आनंद झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. रुग्णालयात चांगले उपचार मिळाले असेही ते म्हणाले. जिल्ह्यात 17 रुग्ण संसर्गम...

ममंगेश येवले@ Navapur Live लॉकडाऊन 04 मध्ये अधिक शिथिलता मिळण्याची शक्यता!राज्य सरकार

Image
लॉकडाउन कालावधी चौथा जवळपास निश्चित आहे. महाराष्ट्रामध्ये कोविड-19 रुग्णसंख्या मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव, औरंगाबाद, सोलापूर आणि नागपूर या प्रमुख शहरात वाढताना दिसतच आहे. ही प्रमुख शहरं रेड झोन क्षेत्रात येत असून या शहरांमध्ये प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अटी शिथील न करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. मात्र, शहरातील काही भागांमध्ये जिथे रुग्ण आढळले नाहीत अशा भागांमध्ये सूट देण्याचा जवळपास निर्णय राज्य सरकार घेत असल्याचं समजतं आहे. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात लोकं शहरी भागातून ग्रामीण भागात स्थलांतर करत आहेत. अशा काळात ग्रामीण भागांमध्ये सुद्धा अधिक कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे

मंगेश येवले@ Navapur Live मुख्य बाजारात सोशल डिस्टनसिंग चा फज्जा स्वयंसेवकाची नेमणुकीची गरज !

Image
*नवापूर- मुख्य बाजारात सोशल डिस्टनसिंग चा फज्जा*स्वयंसेवक होमगार्ड ची नेमणुकी ची मागणी* नवापूर शहरात तालुका प्रशासना कडून आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्याचा परिणाम रविवारी सकाळी 6 वाजे पासून बाजारात नागरिकांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे त्या ठिकाणी नागरिकां कडून सोशल डिस्टनसिंग चा रीतसर फज्जा उडवला जात आहे      नवापूर तालुका प्रशासना कडून मुख्य लाईट बाजारात नागरिकांची नेहमीच वर्दळ   असते आशा ठिकाणी होमगार्ड अथवा  स्वयंसेवक नेमणे अत्यावश्यक आहे नवापूर पोलीस होमगार्ड  स्वयंसेवका ची नेमणूक फक्त वाहन तपासणी साठी न करता गर्दी पांगवण्यासाठी किंवा सोशल डिस्टनसिग चे नियम पाळले जात नाही अशा ठिकाणी होमगार्ड आणि स्वयंसेवका ची नेमणूक केल्यास नक्कीच गर्दी होण्यावर अंकुश बसेल आणि सोशल डिस्टनसिंग राखण्यास मदत होऊ शकते

मंगेश येवले@Navapur Live लॉकडाऊन मध्ये कोरोना मूळे नाही भूकमरी ने घेतला जीव

Image
. शिवपुरी----      -सुरत (गुजरात) इथल्या कापड मिलमध्ये काम करत होते. लॉकडाऊनमध्ये मिल बंद झाली. बेरोजगार झालेले हे दोघे लाचार होऊन उपाशीपोटी ट्रकमध्ये बसून आपल्या गावी परतत होते. रस्त्यात थकवा, दिहायड्रेशन आणि उपाशी असल्याने एकाची तब्येत बिघडली. त्याला ताप चढला. चक्कर यायला लागली. उलट्या व्हायला लागल्या.  कोरोनाच्या अफवेने ट्रकमध्ये बसलेल्या इतर मजुरांनी त्याला जबरदस्तीने ट्रकमधून खाली उतरवले. त्याच्यासोबतचा मजूरही मित्रासाठी खाली उतरला.  रस्त्यावरुन जाणाऱ्या गाड्यांना रडत रडत त्याने मदत मागितली. एका भल्या माणसाने त्याला दवाखान्यात पोहोचवले. पण तोपर्यंत त्याची तब्येत इतकी बिघडली होती की दवाखान्यात त्याला वाचवता आले नाही.  मरणारा मजूर हिंदू होता आणि अंतिम क्षणापर्यंत त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणारा मजूर याकूब ! हा बंधुभाव आहे आणि हीच मानवता आहे. आपली व्यवस्था त्याचाच खून करुन द्वेष पेरत आहे.

मंगेश येवले @Navapur Live नंदुरबार जिल्हा लवकरच कोरोना मुक्त होणार

Image
आनंदवार्ता.... शहादा येथील 65 वर्ष वयाच्या पुरुष रुग्णांचा तिसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने व उपाचारांती तो संसर्गमुक्त झाल्याने त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. इतर 24 व्यक्तींचे अहवालदेखील निगेटिव्ह आले आहेत.

अअअअअ

मंगेश येवले@ Navapur Live *शहादा तालुक्यातील बामखेडा गावात 52 वर्षीय रुग्ण पोजिटिव्ह आढळल्याने खळबळ 30 लोकांना केले कोरेन्टीन*

Image
*NLN Breking News*🔴🔴 *शहादा तालुक्यात कोरोना पोजिटिव्ह आढळल्याने खळबळ 30 लोक कोरेन्टीन* *बामखेड़ा-कोरोनाच्या एक रुग्ण बामखेडा त.त.ता शहादा येथे आढळला जिल्हा प्रशासन हादरले!* *बामखेड़ा-कोरोनाच्या एक रुग्ण बामखेडा त.त.ता शहादा येथे आढळला असून खबरदारी म्हणून मिरानगर हा भाग प्रशासनाने सिल केला आहे एक 52 वर्षीय व्यक्ति किडनी रोगाने त्रस्त होता त्यास नाशिक येथील खाजगी रुग्णालयात बामखेड़ा येथून दि 9 मे 2020 रोजी नेण्यात आले त्या नंतर तेथे तपासणी केली असता त्या रुग्णाच्या अहवाल हा कोविड-19 पॉजिटिव्ह आला असून त्यामुळे जिल्हा प्रशासन हादरले असून या पार्श्वभूमिवर शहादा तहसीलदार मिलिंद कुलकर्णी शहादा पंचायत समितीचेगटविकासअधिकारी सी.टी. गोस्वामी तसेच शहादा तालुका वैद्यकीय अधिकारी डाँ.राजेंद्र पेंढारकर यांनी तात्काळ भेट दिली व प्रशासणातर्फे जवळपास 1.5 कि.मीचा परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून सिल करण्यात आले असून महसूल विभागाचे तलाठी नितेश मोरे,मंडळ अधिकारी सावळे,कोतवाल खुशाल महाले कोविड अँटीफोर्स वाँरियर्स,पोलिस व आरोग्य प्रशासन हायअलर्ट आहेत रूग्णाच्या कुटुंबाचे व त्याव्यक्तींच्या व कु...

मंगेश येवले@Navapur Live नंदुरबार जिल्ह्यासाठी सुखद बातमी 6 रुग्ण कोरोना मुक्त आज मिळाला डिस्चार्ज !

Image
आनंदवार्ता..... सहा रुग्ण कोविड संसर्गमुक्त होऊन घरी परतले नंदुरबार दि.15-जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सहा रुग्णांचे अखेरचे दोन कोविड_19 चाचणी अहवाल निगेटीव्ह आले असून संसर्गमुक्त झाल्याने त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या उपस्थितीत रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. इतर 31 व्यक्तींचे अहवालदेखील निगेटीव्ह आले आहेत. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.के.डी. सातपुते, डॉ.राजेश वसावे, डॉ.राजेंद्र चौधरी आणि रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. यापूर्वी 9 रुग्ण संसर्गमुक्त झाले असून 10 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यापैकी चार रुग्णांचे 14 दिवसानंतरच्या चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. संसर्गमुक्त झालेल्या रुग्णात शहादा येथील तीन पुरुष (वय 40, 44 आणि 48) आणि दोन मुलींचा (वय 12 आणि 15) समावेश आहे, तर अक्कलकुवा येथील एका पुरुषाचा (वय 58 ) समावेश आहे.  जिल्हा रुग्णालयाच्या  विलगीकरण कक्षात या सर्व रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. वेळेवर संसर्गाचे निदान झाल्याने उपचाराअंती रुग्ण संसर्गमुक्...

मंगेश येवले@ Navapur Live ज्यादा दराने खत विक्री केल्यास कारवाई कृषी अधीक्षक बी एन पाटील

Image
खरीपासाठी पुरसे खत उपलब्ध जादा दराने खते विक्री केल्यास कारवाई होणार नंदुरबार दि.14 जिल्ह्यात  दर महिन्याच्या मंजूर आवंटनानुसार खत प्राप्त होणार आहे असल्याने शेतकऱ्यांनी अफवांवर  विश्वास ठेवू नये व आवश्यक तेवढेच खत खरेदी करावे.  तसेच कृषी सेवा केंद्रांनी जादा दराने कृषि निविष्ठा विक्री केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी.एन. पाटील यांनी कळविले आहे. जिल्ह्यासाठी खरीप हंगामात 1 लाख 10 हजार 875 मे. टन रासायनिक खतांची उपलब्धता होणार आहे.  मागील शिल्लक साठा व या हंगामात आजपर्यंत प्राप्त खते मिळून 25527 मे. टन  एवढे पुरेसे रासायनिक खत आता उपलब्ध असून उर्वरीत खत मागणीप्रमाणे टप्प्याटप्प्याने प्राप्त होणार आहे.   जिल्ह्यात येणाऱ्या खरीप हंगामात जवळपास 289800 हे. क्षेत्रावर पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे.  त्यामध्ये प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी इ. प्रमुख पिकांचा समावेश आहे.  त्यासाठी आवश्यक निविष्ठा उपलब्ध होण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे.   रासायनिक ख...

मंगेश येवले @ Navapur Live। नगर पालिका क्षेत्रात दुकानाच्या वेळेत बद्दल जिल्हाधिकारी यांचे नवीन आदेश जारी

Image
दुकानांच्या वेळेत शिथीलतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश   नंदुरबार दि.14 : जिल्ह्यात नगरपालिका क्षेत्रातील व अक्कलकुवा ग्रामपंचायत क्षेत्रातील आस्थापना व दुकाने लॉकडाऊन कालावधीत अर्थात 17 मे 2020 पर्यंत सकाळी 7 ते दुपारी 12 आणि सायंकाळी 4 ते 7 या वेळेत सुरू राहतील, असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी आदेशित केले आहे. लॉकडाऊनमध्ये वैद्यकीय सेवा, मेडीकल, भाजीपाला, किरणा दुकाने व दुध विक्रेते यांची दुकाने त्यांच्या परवाना परवानगीनुसार पूर्णवेळ सुरू राहतील. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आस्थापना व दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत त्यांच्या परवाना परवानगीनुसार सुरू राहीतील. प्रतिबंधीत क्षेत्र घोषित झाल्यानंतर त्या क्षेत्राचे नियम लागू राहतील. कुठल्याही कार्यालयास वेळेत बदल करण्याचा अधिकार असणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांना या आदेशामुळे आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळणार आहे. नागरिकांनी दुकानाच्या ठिकाणी गर्दी करू नये. दुकानात जाताना व खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे व चेहऱ्यावर मास्कचा वापर करावा. दुकाने व आस्थापनांनीदेखील ...

मंगेश येवले@Navapur Live नवापूर नगर पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तब्ध

Image
नवापूर- लॉकडाऊन चा तिसरा टप्प्यात नवापूर शहरात परिस्थिती सामान्य दिसत आहे नगर पालिका प्रशासना कडून शहरात निर्जंतुकीकरण करण्याचा कामाला ब्रेक लागलेला आहे जणू काही नवापुरात कोरोना विषाणू प्रादुर्भाव होणारच नाही हा भ्रम नगर पालिका प्रशासनाला झालेला दिसत आहे तर नगरसेवक जणू काही शहरात आहेत की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे काही भागात रस्त्याचे काम सुरू करून धन्यता मानण्याऱ्या नगरसेवक ठेकेदारांच्या मदतीला धावून जातांना दिसत आहेत कोरोना विषाणू ची गंभीरता कोणालाच दिसत नाही नगर पालिका क्षेत्रात खरेदी साठी नागरिक खेड्या पड्यातून इतर शहरातून स्थलातरीत मजुरांचे नवापूर शहरातून होणारे  मार्गक्रमण करत आहेत त्या साठी शहरात भाजीपाला बाजार, लाईट बाजार  मेंनरोड , शहरातील अनेक कॉलनी मध्ये रोज सेनेटाइझ फवारणी अत्यावश्यक  असतांना कोठेही प्रामाणिक कामे दिसत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत         पालिका प्रशासन आणि नगरसेवकांनी जणू काही नवापूर ह्या महामारी पासून जिकले असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करत आहे सुदैवाने आज नवापूर तालुक्यात कोरोना ला थारा मिळालेला ना...

मंगेश येवले @ Navapur Live खांडबारा गावातील सर्व सीमा सील एक डॉक्टर सहित 14 लोकांना केले कोरेंनटाईन

Image
*नवापूर- खांडबारा -दि 9 रोजी सायंकाळी 7 वाजता 52 वर्षीय महिला आणि मुलाला कोरेंन्टाईन केले आहे दि 8 रोजी 12 लोकांना कोरेन्टीन करण्यात आले होते आता एकूण 14 लोकांना विलगिकरन कक्षात दाखल करण्यात आले आहे*   नवापूर पासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या खांडबारा गावात एकूण 14 लोकांना विलगिकरन कक्षात ठेवण्यात आले असून त्यांचे स्वेब नमुने तपासणी साठी पाठवण्यात आले आहे        कोरोना पोजिटिव्ह आष्टे येथील68 वर्षीय महिला 4 दिवसा अगोदर खांडबारा येथील नातेवाईकांच्या  संपर्कात आलेल्या   एका डॉक्टर सहित 14 लोकांना कोरेन्टीन करण्यात आले असून गावातील सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत आज खांडबारा गावात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला

मंगेश येवले @ Navapur Live नंदुरबार जिल्हयातील आज 4 रुग्ण कोरोना मुक्त एकूण 9 रूग्णांना मिळाला डिस्चार्ज

Image
*नवापूर-आनंदाची बातमी 4 रुग्ण कोरोना मुक्त* नंदुरबार जिल्ह्या साठी आनंदाची बातमी आली आहे   आज 4 कोरोना रुग्णांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे अक्कलकुवा येथील तीन महिला आणि शहादा येथील युवकाचा समावेश आहे त्यांना 108 रुग्ण वाहिके द्वारे घरी सोडण्यात आले             आता पर्यंत 9 रुग्ण उपचार दरम्यान संसर्गमुक्त  झाले कोरोना विषाणू चा वेळीच उपचार मिळाल्यास रुग्ण बरा होत आहे तरी नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्ग लक्षणे आढळल्यास शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी केले आहे पालक मंत्री के सी पाडवी नवापूर चे आमदार शिरीष नाईक जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी जिल्हारुग्णालयात उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे

मंगेश येवले @ Navapur Live धुळे येथे उपचार दरम्यान नवापूर पंचायत समिती सेवेत असलेले ग्रामसेवक कोरोना पोजिटिव्ह

Image
मंगेश येवले @NavapurLive नवापूर येथे कार्यरत ग्राम सेवक कोरोना पोजिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे   नवापूर पंचायत समिती मध्ये सेवेत असलेले 53 वर्षीय ग्राम सेवक मागील एक महिन्या पासून धुळे येथे डायलिसिस उपचार घेत होते दरम्यान सेवा हॉस्पिटल मध्ये कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांच्या स्वेब नमुने तपासणी साठी पाठवण्यात आले होते त्यात त्यांचा तपासणी अहवाल कोरोना पोजिटिव्ह आला आहे समाधनाची बाब म्हणजे   नवापूर मधील कोणतीही व्यक्ती त्यांच्या। संपर्कात आलेली नसल्याची माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली आहे

मंगेश येवले@ Navapur Live कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या खांडबारा येथील 11 लोकांना केले कोरेन्टीन खांडबारा गाव पुढील तीन दिवस सम्पूर्ण लॉकडाऊन !

Image
*नवापूर - नवापूर तालुक्यात धोक्याची घंटा खांडबारा गाव सील तीन दिवस लॉकडाऊन   नंदुरबार शहरात  पुन्हा 80 वर्षाच्या आजीला कोरोनाची लागण झाल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून आता पर्यंत एकूण कोरोना पोजिटिव्ह रुग्ण संख्या 21 त्यातील एकाचा मृत्यू तर 5 लोकांना उपचारा नंतर डिस्चार्ज देण्यात आल्याने एकूण 15 रुग्ण जिल्हारुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी दिली आहे        नंदुरबार तालुक्यातील आष्टे येथील 68 वर्षीय कोरोना पोजिटिव्ह   महिलेचा खांडबारा कनेक्शन उघड झाल्याने नवापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे नवापूर तालुका प्रशासनाने खबरदारी म्हणून कोरोना संसर्ग चे नातेवाईक जावई , मुलगी ,नात व इतर 11 व्यक्तींना खांडबारा येथील नंदुरबार रोड वरील शनी मंदिर समोरील शासकीय मुलांचे वसतिगृहात  शासकीय कोरेंनटाईन सेंटर मध्ये कोरेन्टीन करण्यात आले आहे      आज पासून तीन दिवस सम्पूर्ण खांडबारा  शहर लॉकडाऊन करण्यात आले असून कोणीही घरा बाहेर पडू नये वाहन किंवा पायी फिरण्याचा प्रयत्न करू नये फि...

मंगेश येवले@Navapur Live लॉकडाऊन मध्ये होरपळलेल्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व्यापारी संतप्त

Image
नवापुरात दुकानदारांना सूट दिल्या नंतर कारवाई व्यापारीं मध्ये पुन्हा असंतोष       जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊन च्या तिसऱ्या टप्यात शासनाच्या निर्देशा नुसार दुकाने उघडण्यास सूट दिली होती नवापूरात सूट दिल्याने  दुकाने दोन दिवसा पासून दुकाने सुरू केली होती सामान्य दुकानदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले हिते आज सकाळी मुख्याधिकारी  नगर परिषद कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाच्या ताफ्या ने  दुकानदार सोशल डिस्टनसिंग चे पालन करत नसल्या मूळे 10 ते 11 दुकान मालकावर  दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे समजते तर काही दुकानदारांनी अधिकारी पोलीस  गाड्याचा ताफा बघताच आपली दुकाने बंद करून घेतली होती आशा दुकानदारांना पुन्हा दुकाने उघडायला लावून कारवाई करण्यात आल्याने अगोदरच लॉकडाऊन मूळे आर्थिक नुकसान होऊन होरपळलेल्या नवापूर शहरातील व्यापारी मध्ये असंतोष पसरला आहे दुकाने ऊघडण्याची 8 ते12 वाजे पर्यन्त परवानगी दिल्यावर  या वेळेच्या आत होत असलेल्या दंडात्मक कारवाईने आश्चर्य व्यक्त केले जात आहे 

मंगेश येवले @ Navapur Live *सोशल डिस्टनसिंग चे पालन न करणाऱ्या बुद्धीजीवी लोकांना मुक्या जनावरांनी दिला संदेश* नंदुरबार जिल्ह्यासाठी दिलासा दायक 5 रुग्ण कोरोना मुक्त

Image
- शहादा येथील 53 वर्षीय इसम कोरोना मुक्त* नंदुरबार जिल्ह्यात कोरोना पोजिटिव्ह रुग्णांची संख्या 19 झाली आणि जिल्ह्यात खळबळ उडाली होती दोन दिवसात पाच रुग्णांचा योग्य उपचारा मुळे स्वेब तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने नंदुरबार जिल्ह्या साठी दिलासादायक बाब आहे      दि 6 रोजी नंदुरबार येथील 4 रुग्ण आणि आज शहादा येथील एका 52 वर्षीय इसमाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे आता जिल्ह्यात 19 रुग्ण पैकी 1 मृत्यू झाला होता तर 5 लोकांना उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला असून आता रुग्णांच्या संख्येत झालेली घट नंदुरबार जिल्हा प्रशासन व नागरिकांसाठी आनंदाची बाब आहे परंतु नागरिकांनी दक्षता घेण्याची आवश्यकता असून बऱ्याच ठिकाणी सोशल डिस्टनसिंग चे पालन होत नसल्याने खूप चिंतेची बाब आहे नवापूर शहरात मुक्या जनावरांनी बुद्धीजीवी लोकांना सोशल डिस्टनसिंग  कसे असते दाखवायचा  प्रयत्न केलेला दिसून आला स आहे तो अचूक क्षण आमच्या प्रीतिनिधी नि टिपला आहे ह्या मुक्या जनावरांनी साऱ्या जगाला जणू काही संदेश दिला आहे

मंगेश येवले @ Navapur। Live। Breking News डोकारे साखर कारखाना परिसरात आग

Image
नवापूर तालुक्यातील नवागाव येथिल डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना परिसरात दुपारी अचानक आग लागल्याने खळबळ उडाली आहे      आगीचे कारण समजू शकले नाही अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असून नुकसानी बाबत अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही 

मंगेश येवले@Navapur Live 20 ते 25 मजुरांचा परिवार सहित नवापुरात प्रवेश धोक्याची घंटा ! मजुरांची आरोग्य तपासणी करा माजी नगराध्यक्ष रमला भाई राणा यांची मागणी

Image
*नवापूर शहरात आरोग्य तपासणी न करताच मजुरांना प्रवेश धोक्याची घंटा* मंगेश येवले @Navapur Live   लॉकडाऊन 03 नंतर पप्रप्रांतीय मजुरांची घर वापसी सुरू झाली आहे  गुजरात राज्यातील हजारो मजुरांना तपासणी न करताच प्रवेश देण्यात येत असल्याने कोरोना विषाणू संसर्ग वाढण्याची नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे  लॉकडाऊन चा तिसरा टप्प्यात प्रवेश झालेला आहे आता पर्यंत परराज्यात अडकून पडलेले मजूर आज मिळेल त्या साधना ने अथवा पायी आपला प्रवास सुरु केलेला आहे परंतु नवापूर शहर सीमावर्ती भागात असल्याने अनेक राज्यातील मजूर सीमा तपासणी नाका बेडकी नवापूर मार्गे जात आहेत तेथे  तपासणी साठी यंत्रणा नसल्याचे दिसून येत आहे  :- गुजरात राज्यात मजुरीसाठी गेलेल्या मजुरांना गुजरात सरकारने गेल्या तीन दिवसापासून नवापूर तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 सीमावर्ती भागात येऊन सोडायला सुरुवात केली होती. कालपासून गुजरात राज्यातून परत येणाऱ्या मजुरांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामध्ये पायी प्रवास, मोटरसायकल, ट्रॅक्टर, ट्रक, लक्झरी बस, खाजगी वाहने अशाप्रकारे मिळेल त्या वाहनाने मजुरांनी आपल्या ...

नवापूर- मंगेश येवले @Navapur Live ब्रेकिंग न्युज लॉकडाऊन दोन आठवड्यांनि वाढला ! नंदुरबार जिल्हा ऑरेंज झोन मध्ये अटी शर्ती वर सवलती मिळणार

Image
देशात लॉकडाऊन तिसऱ्या टप्यात दोन हप्त्याने वाढवण्यात आल्याचे केंद्र शासन च्या वतीने घोषणा करण्यात आली असून4 मे पासून 17 मे पर्यन्त लॉकडाऊन राहणार आहे                  नंदुरबार जिल्हा ऑरेंज झोन मध्ये असल्याने काही अटीशर्ती वर सवलती मिळणार असल्याने जिल्ह्यासाठी समाधानाची बाब आहे अटी शर्ती महाराष्ट्र शासनाचा पुढील आदेश येईल तेव्हाच सवलती बाबत उलगडा होणार आहे 

नवापूर - नवापूर पोलिसांची कारवाई 50 लाखाचा मुद्देमाल तंबाखू गुटखा जप्त

Image
*नवापूर- नवापूर पोलिसांची मोठी कारवाई तंबाखू जन्य पदार्थ 50 लाखाचा मुद्देमाल जप्त*   नवापूर पोलिस निरीक्षक  विजयसिंग राजपूत यांना  मिळालेल्या गुप्त माहिती वरून नवापूर पिंपळनेर चौफुली जवळ ट्रक ची तपासणी केली असता महाराष्ट्रात बंदी असलेला विमल तंबाखू गुटखा आढळून आला आहे      ट्रक क्र MH 31GB 8837  हा जीवनावश्यक वस्तू वाहतुकीच्या नावा खाली महाराष्ट्रात बंदी असलेला विमल तंबाखू गुटखा तांदुळाच्या चुरीच्या आड लपवलेला आढळून आला सदर ट्रक आणि मुद्देमाल एकूण 50 लाख रु किमतीचा साठा जप्त केला आहे सदर कारवाई पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलिस अधिक्षक चंद्रकात गवळी,उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनात नवापूर पोलीस निरीक्षक  विजययसिंग राजपूत सहाययक पोलीस निरीक्षक दिगम्बर शिंपी , धीरज  महाजन आणि टीम ने केलेल्या कारवाई ने पुन्हा गुटखा तस्करी चे मोठे रॅकेट असल्याची बाब उघड झाली आहे  गेल्या आठवड्यात गुजरात पोलिसांनी आयशर टेम्पो आणि पिकअप मध्ये होत असलेली तस्करी उघड झाली होती महाराष्ट्र जीवनावश्यक कायदा 2005 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात ...