मंगेश येवले @ Navapur Live अत्यावश्यक सेवे च्या नावाने आतंरराज्यीय गुटखा तस्करी आरोपी नवापुरचा असल्याने पुन्हा गुटखा तस्करी चे नवापूर कनेक्शन उघड !
आंतरराज्यीय गुटखा तस्करी सक्रीय;
गुजरात पोलिसांनी केली कारवाई तीन लाखांचा मुद्दे माल जप्त
लॉकडाऊन मध्ये गुजरात पोलिसांनी केलेली ही दुसरी कारवाई आहे या आधी निझर येथे जप्त केलेल्या पिकअप वाहन सोबत नवापूर स्थित रहिवासी रज्जाक अलील मेमन आरोपी मिळून आला होता आजच्या कारवाईने महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या तंबाखू जन्य पदार्थाची तस्करी जोमात असल्याचे चित्र दिसत आहे
- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पण याच लॉकडाऊनचा गैरफायदा घेत नवापूर शहरातील आंतरराज्य गुटख्याची तस्करी करणारे सक्रीय झाले आहे. सध्या लाॅकडाऊन असल्याने गुटखा शौकिनांना गुटखा मिळत नसल्याचा फायदा तस्कर पाच रुपयाचे पुढी पन्नास रुपयाला विक्री करीत असल्याचे गुटख्याची सर्वत्र मागणी वाढल्याने गुटखा तस्करी सक्रीय झाली आहे. संबंधित विभागाचे अधिकारी यावर नियंत्रण मिळवणे अशक्य झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
गुजरात राज्यातील सोनगड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास गुजरात राज्यातील सोनगड येथे अवैधरीत्या गुटखा तस्करी करत असल्याची गुप्त माहिती सोनगड पोलिसांना मिळाली पोलीसा सापळा रचून महामार्गावरून येणारी आयसर टेम्पो क्रमांक एम एच 39 सी 682 तपासणी केली असता 84 हजार 100 रुपयांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ दिसून आले. आयसर टेम्पो किंमत दोन लाख एकूण दोन लाख 84 हजार 100 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी रजाक अलील मेमन वय 48 रा.लखाणी पार्क नवापूर जिल्हा नंदुरबार जीवनावश्य वस्तूंच्या नावाखाली गुटखा तस्करी करत असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.
अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुजरातमधून महाराष्ट्रात गुटखा वाहतूक केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. या काळात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी शासनाने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना परवानगी दिली. मात्र याचा गैरफायदा घेत मोठ्याप्रमाणावर गुटख्याची तस्करी होत आहे असल्याचं समोर आलं आहे.
Comments
Post a Comment