वाकीपाडा गावातील परराज्यातून आलेल्या 15 लोकांना शेल्टर हॉल मध्ये केले कोरेंनटाईन
*नवापूर- वाकीपाडा गावातिल 15 लोकांना केले शेल्टर हॉल मध्ये कोरेंनटाईन*
लॉकडाऊन झाल्या पासून परराज्यात मजुरी साठी गेलेले मजूर 8 दिवसा पासून वाकीपाडा गावात आलेले होते या अगोदर वाकीपाडा गावातील सरपंच तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी शासकीय यंत्रणेला या बाबत माहिती देण्यात आली होती त्याच वेळेस आरोग्य विभागा कडून त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना घरातच कोरेंनटाईन केले होते परंतु पुन्हा येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने सुरक्षे च्या दृष्टीने परराज्यातून आलेल्या 15 लोकांना आज तहसीलदार सुनीता जर्हाड पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत ,गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर आरोग्य अधिकारी डॉ हरिषचन्द्र कोकणी यांनी वाकीपाडा गावाची पाहणी करत परराज्यातून आलेल्या लोकांची आरोग्य तपासणी करून त्यांना शेल्टर हॉल मध्ये कोरेंनटाईन करण्यात आले त्यांचा संपर्कात असलेल्या 15 लोकांचे नातेवाईक यांना होम कोरेनंटाईन केले आहे वाकीपाडा गावातील सरपंच पोलीस पाटील तसेच आरोग्य विभागाचे पथक यांच्या निगराणीत ठेवण्यात आले असल्याची माहिती आरोग्य अधिकारी कोकणी यांनी दिली असून कोरेनटाईन केलेल्या लोकांनि नियमांचे ऊल्लंघन केल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील या बाबत तहसीलदार व पोलिसनिरीक्षक विजयसिंग राजपुत यांनी सूचना दिल्या आहेत
Comments
Post a Comment