लॉकडाऊन चा ११ वा दिवस बाजारात नियमाची पायमल्ली
*नवापूर-लॉकडाऊन चा ११ वा दिवस* मास्क न लावता विक्री
नवापूर तालुक्यात 2304 लोकांना आता पर्यंत होम कोरेंनटाईन केलेले आहे
नवापूर येथील कोरेंनटाईन सेंटर 29 पैकी 18 लोकांना घरी सोडण्यात आले असून सोलापूर येथून आलेल्या 11 लोक आरोग्य विभागाच्या निगराणीत असून दि.3 मार्च रोजी पुण्याहून आलेल्या व्यक्तीचे घशातील द्रव्य सॅम्पल चाचणी साठी पाठवण्यात आले होते त्याचा निगेटिव्ह रिपोर्ट आला आहे नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा एक ही रुग्ण आढळलेला नसला तरी नागरिकांनी काळजी घेत घरीच राहण्याचे आवाहन प्रशासन करत आहे
आज शनिवार आठवडे बाजार असल्याने रंगावली नदी किनारी भरलेल्या भाजीपाला बाजारात सोशल डिस्टनसिंग कोठेच दिसुन आले नाही विक्रेते मास्क न लावताच भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूची विक्री करताना दिसत होते प्रशासना कडून वेळो वेळी सोशल डिस्टनसिंग चे आवाहन करण्यात येत असले तरी नागरिक आणि विक्रेते ही सर्रास नियमांचे उल्लंघन करतांना दिसत आहे आज लॉकडाऊन च्या 11 व्या दिवशी ही लोकांना कोरोना वायरस किती घातक आहे या बाबत ची गँम्भीरता लक्षात येत नसल्याचे दिसून येत आहे
Comments
Post a Comment