श्री जी गेस्ट हाऊस मालकावर गुन्हा दाखल
*संचारबंदी चे उल्लंघन श्री जी गेस्टहाऊस मालकावर गुन्हा दाखल*
नवापुर: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासन आदेशान्वये गेस्टहाउस बंद ठेवणे गरजेचे असतांना गेस्टहाउस भाड्याने दिल्याप्रकरणी महामार्गावरील गेस्टहाउस मालकाच्या विरोधात नवापुर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन श्री जी गेस्टहाउस मालक नांनकचंदअग्रवाल यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीस सुत्रानुसार विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालय समोर महामार्गावरील श्रीजी गेस्ट हाउसची खोली पैसे घेउन भाड्याने देण्यात आल्याची गुप्त माहिती पोलीस निरिक्षक विजयसिंग राजपुत यांना मिळाली. शासनाने संचारबंदीचे आदेश पारीत केले असतांना व गेस्ट हाउस मालकाच्या या कृत्यामुळे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस निरिक्षकांनी गेस्टहाउसवर छापा टाकण्याचा निर्णय घेतला. शासनाचे दोन पंचांना पोलीस ठाण्यात घटनेची हकीकत सांगुन पोलीस उपनिरिक्षक नासीर पठाण, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक कृष्णा पवार, पोहेकॉ गुमानसिंग पाडवी, पोकॉ आदिनाथ गोसावी, जयेश बावीस्कर, ज्योती पोटे यांच्या पथकाने कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची दक्षता घेत काल दिनांक 15 रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास श्रीजी गेस्ट हाउस येथै जाउन पाहणी केली असता तेथील एका खोलीत तिनटेंबा येथील बांधकाम करणारा मिस्त्री व आमलाण ता. नवापुर येथील एक 28 वर्षीय महिला आढळुन आले. पंचासमक्ष घटनेचा पंचनामा करुन गेस्टहाउसचे नोंदणी पुस्तक व गेस्टहाउस मालक नानकचंद हिरालाल अग्रवाल यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. तिघांविरोधात कोरोना कायदा व लाॅकडाउन उल्लंघनाचे व आपत्ती व्यवस्थापन कायदा कलमान्वये रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक नासीर पठाण व सहकारी करीत आहेत.
Comments
Post a Comment