मंगेश येवले नवापूर - शेल्टर होम मधून पळालेल्या युवकांना खातगाव रेल्वे स्टेशन वर LCB ने घेतले ताब्यात
*नवापूर- शेल्टर होम मधून पळालेल्या युवकांना*खातगाव स्टेशन वर नंदुरबार LCB ने घेतले ताब्यात*
लॉकडाऊन दरम्यान मध्यप्रदेश मधील 34 युवक पायी जात असतांना नवापूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत आरोग्य तपासणी करून (शेल्टर होम )निवारा कक्षात ठेवले होते
कोरोना विषाणू चा संसर्ग टाळण्यासाठी उपाय योजना म्हणून गुजरात राज्यातून पायी चालत जाणाऱ्या मध्यप्रदेशातील युवकांची नवापूर RTO तपासणी नाक्या वरील हॉल येथे शासना कडून निवारा कक्ष येथे व्यवस्था करण्यात आली होती
दोन दिवसा पूर्वी कला वाणिज्य महाविद्यालयात नवापूर येथे ह्या 34 युवकांना ठेवण्यात आले होते
ह्या युवकांनी दि 26 रोजी नित्कृष्ट जेवण मिळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल केला होता प्रशासना कडून त्याची तातडीने दखल घेत त्यांची भेट घेऊन सुविधा पुरवण्या सम्बधी सांगितले असतांना रात्री च्या सुमारास 34 युवका पैकी आठ युवकांनी शेल्टर होम चा दरवाजाची कडी तोडून पालयन केले होते अवघ्या काही तासात नंदुरबार LCB च्या टीम ने खातगाव रेल्वे स्टेशन वर ह्या युवकांना ताब्यात घेतले असून नवापूर ला आणण्याची कारवाई सुरू आहे
Comments
Post a Comment