नवापूर-मंगळवार गुरुवार,शनिवार बाजार बंद
नवापूर-मंगेश येवले
देशात लॉकडाऊन घोषित असून संचारबंदी ही लागू आहे नवापूर शहरात पोलीस प्रशासन सोबत महसूल,नगरपरिषद,आरोग्यविभाग वेळोवेळी घरातच राहण्याचेआवाहन करत आहे
सोशल डिस्टनसिंग, मास्क लावणे बाबत सूचना करत आहेत परंतु नवापूर मधील भाजीपाला बाजार सोबत जीवनावश्यक वस्तूची दुकाने नियमांचे पालन करत नसल्याचे निदर्शनात आले
मास्क न लावल्या बद्दल नवापुरात आता पर्यंत दोन गुन्हे दाखल होऊन नागरिक काळजी घेत नसून नियमांचे उल्लंघन करत असल्याने दि 12 रोजी नवापूर तालुका प्रशासना कडून मंगळवार, गुरुवार ,शनिवार रोजी बाजार बंद चा निर्णय घेतला आहे यात दूध सेवा,डॉक्टर, मेडिकल स्टोअर्स वगळता सर्व बाजार बंद राहणार असल्याचे तहसीलदार, BDO, मुख्याधिकारी व नवापूर पोलीस निरीक्षक यांनी एका पत्रका द्वारे जाहीर केले आहे
Comments
Post a Comment