मंगेश येवले @ Navapur Live नंदुरबार जिल्ह्यात एकाच दिवसात 5 पोजिटिव्ह रुग्ण आढळल्यानेआता पोजिटिव्ह रुग्ण 17 वर गेल्याने जिल्ह्या रेडझोन !
नवापूर- सावधान नंदुरबार जिल्हा रेडझोन !
लॉकडाऊनच्या पहिल्या टप्यात कोरोना मुक्त असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात दुसऱ्या टप्यात मात्र रेडझोन पर्यन्त पोहचले आहे एकूण कोरोना पोजिटिव्ह रुग्णांची संख्या 17 वर गेली आहे
कोरोना विषाणू चा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने जिल्ह्यातील लोकांनी सतर्क होण्याची आवश्यकता आहे
ज्या नागरिकांनी मागील 15 दिवसात प्रवास केला असेल अश्या प्रवाश्यानी खोकला ,ताप, किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्यांनी त्वरित आपल्या जवळच्या ग्रामीण रुग्णालयात किंवा तहसीलदार यांच्याशी संपर्क करावा जेणे करून अश्या प्रवाश्याची वैद्यकीय चाचणी लगेच होऊ शकेल
शहादा येथील पोजिटिव्ह आलेल्या रुग्णाने उशिरा वैद्यकीय तपासणी केल्या मुळेच एकाच कुटुंबातील 5 लोकांना संसर्ग वाढला असल्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी सांगितले असून जिल्ह्यात कोरोना पोजिटिव्ह रुग्णांची संख्या 17 वर गेल्याने पहिल्या टप्यात ग्रीन झोन मध्ये असलेला नंदुरबार जिल्हा लॉकडाऊन च्या दुसऱ्या टप्यात रेड झोन मध्ये प्रवेश करत असल्याने प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे
नागरिकांनी रमझान महिन्यात घरा बाहेर पडू नये तसेच नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासना कडून करण्यात आले आहे
Comments
Post a Comment