नंदुरबार जिल्हा आज ही कोरोना मुक्तच
साक्री येथील मयत कोरोना पोजिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले चिंचपाडा येथील दाम्पत्य आणि चालक यांचे स्वेब नमुन्या चा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती नंदकुमार वाळेकर यांनी दिली आहे
चिंचपाडा येथील 69 वर्षीय दाम्पत्य डायलिसिस साठी धुळे येथील सेवा हॊस्पिटल ला गेले होते त्या वेळेस उपचार घेत असलेला साक्री येथील कोरोना पोजिटिव्ह रुग्णाच्या समपर्कात आल्याचे CCTV केमर्यात दिसल्याने धुळे येथील प्रशासनाने नवापूर तालुका प्रशासनाला कळवत चिंचपाडा येथील दांपत्य आणि सोबत चालकाला नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात तपासणी साठी पाठवण्यात आले होते दि 15 रोजी त्याचे अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आल्याने नंदुरबार जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला असून नंदुरबार जिल्ह्यात अजून एकही रुग्ण नसल्याने जिल्हा कोरोना मुक्त असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे
Comments
Post a Comment