नवापूर- मंगेश येवले शनिवार आठवडे बाजार रद्द
*नवापूर- शनिवारआठवडे बाजार रद्द*
कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्या साठी प्रशासना कडून वेळोवेळी सूचना करण्यात येत आहे भाजीपाला बाजार फळ,फ्रुट फेरीवाले ई विक्रेते शासनाच्या नियमांचे पालन करत नसल्याचे निदर्शनात आले आहे
तहसीलदार,पोलीस निरीक्षक,गटविकास अधिकारी, नवापूर नगर परिषद मुख्याधिकारी यांनी एका आदेशा द्वारे कळविण्यात आले आहे की नागरिक व भाजीपाला ,फेरीवाले विक्रेते सोशल डिस्टनसिंग ठेवत नसून तोंडाला रुमाल अथवा मास्क लावत नसल्या मूळे शनिवार आठवडे बाजारात ग्रामीण भागातून येणाऱ्यांची संख्या मोठया प्रमाणात आहे अशा वेळेस गर्दी होऊन कोरोना विषाणू ची लक्षणे असणाऱ्या एखादा रुग्ण जर बाजारात आला तर त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो म्हणून शनिवारी भरणारा आठवडे बाजार दि 11 एप्रिल रोजी भरणारा आठवडे बाजार भरणार नसल्याचा निर्णय घेतला आहे सर्व भाजीपाला ,फळ फ्रुट,व फेरीवाले तसेच नागरिकांनी या बाबत नोंद घ्यावी असे नवापूर नगर परिषद मुख्याधिकारी यांनी पत्राद्वारे कळवले आहे
Comments
Post a Comment