नवापूर- डायलिसिस वर जगणाऱ्या रुग्णांना मिळाला न्याय
नवापूर शहरातिल किडनी च्या आजाराने त्रस्त रुग्ण उपचारा साठी गुजरात राज्यात जात होते कोविड 19 कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने गुजरात मधील सुरत व तापी जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्रातून गुजरात मध्ये उपचार अर्थात डायलिसिस साठी येणाऱ्या रुग्णाचे उपचार करण्यास नकार दिल्याने डायलिसिस वर जगणाऱ्या रुग्णांना नंदुरबार जिल्हारुग्णालय हा एकमेव पर्याय होता
नवापूर येथील भाजपा चे नंदुरबार जिल्हा चिटणीस एजाज शेख यांनी खासदार डॉ हिना गावित आमदार डॉ विजयकुमार गावित यांची शिफारस घेऊन रुग्णांना नंदुरबार जिल्हारुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते परंतु नंदुरबार जिल्हारुग्णालयातून उपचार करण्यास नकार दिल्याने रुग्णाचे वेळेवर उपचार न मिळाल्यास जीवितास धोका असल्याचे बघून एजाज शेख यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेत नवापूर तहसीलदार यांना निवेदन देऊन उपचार जिल्हारुग्णालयात मिळावा या साठी मुख्यमंत्री ,पोलीस अधीक्षक , जिल्हाधिकारी व जिल्हारुग्णालय नंदुरबार यांना उपोषणाचा इशारा देण्यात आला होता तसेच नवापूर लाईव्ह ने सदर बातमी प्रसिद्ध करून जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनात आणून दिल्या नंतर नंदुरबार येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागणी मान्य करत डायलिसिस रुग्णा साठी 5 बेड तयार करण्याची तयारी दर्शवली असून रुग्ण उपचारासाठी जिल्हारुग्णालयात येऊ शकतात असे डॉ राजेश वसावे यांनी सांगितले आहे सदर निवेदनाची तत्काळ दखल घेतल्या बद्दल जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनाने व भारतीय जनता पार्टी चे एजाज शेख आणि पदाधिकारी यांनी डायलिसिस रुग्णांना न्याय मिळवून दिल्या बद्दल नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत
Comments
Post a Comment