नवापूर लाईव्ह चा दणका मास्क न लावल्या बद्दल झाली शिक्षा

मंगेश येवले नवापूर
*नवापूर- नवापूर लाईव्ह चा दणका*
 मास्क न लावताच विक्री करणाऱ्या विक्रेत्याला न्यायालय कडून 1000रु दंड आणि 5 दिवसाची कोठडी 
      दि 12 एप्रिल रोजी नवापूर भाजीपाला बाजारातिल विक्रेते मास्क लावताच विक्री करत असल्याची  बातमी नवापूर लाईव्ह न्युज ब्लॉग वरून प्रसिद्धीस आल्या नंतर नवापूर पोलीस आणि नगरपरिषद च्या संयुक्त  कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला होता सम्बदित व्यक्तीस आज न्यायालयात हजर केले असता 5 दिवसाची कोठडी आणि 1000 रु दंड करण्यात आला आहे  नवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मास्क न लवाल्याबद्दल शिक्षे ची दुसरी घटना आहे 
    पहिल्या घटनेत  मास्क न घालता विनाकारण  गावात फिरत असतांना नवापूर पोलीस पेट्रोलिंग च्या काळात  लाईट बाजारात  कोणतेही कारण नसताना फिरताना आढळला होता  पोलिसांनी हटकले असता त्याने पोलिसां सोबत हुज्जत घातली होती  भा द वि कलम 188 269 प्रमाणे त्याच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला होता  न्यायालयाने युवकाला   5 दिवस कोठडी आणि 1000रुपये दंड अशी शिक्षा केली होती  त्याची नंदुरबार कारागृहात रवानगी करण्यात होती  राज्यातली पहिलीच घटना होती  नवापूर शहरातच आज  दुसऱ्या झालेल्या शिक्षे मूळे   नवापूर पोलिसांचे कौतुक होत आहे नागरिकांनी मास्क घालून काम असेल तरच बाहेर पडावे अन्यथा शिक्षा होणार हे पुन्हा नवापूर पोलिसांच्या करवाईतून दिसत आहे   नागरिकांनी आता तरी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे

Comments

Popular posts from this blog

नवापूर-सोलापूर हुन आलेल्या 11लोकांना केले कोरेनटाईन

गुजरात पोलिसांची कारवाई नवापुरचे तीन अटक 9लाखाच्या मुद्देमाल जप्त (विमल गुटखा तमाखू आणि वाहन)

Mangesh Yeole @ Navapur Live News 27/07/2020