कोरोना विषाणू कोव्हिडं 19 चे योद्धा नवापूर नगरीचे सुपुत्र डॉ निखिल राजेंद्र कोठावदे , डॉ स्वप्नील मावची
मंगेश येवले
*नवापूर - नवापूर चे कोव्हिडं 19 योद्धा डॉ निखिल कोठावदे स्वप्नील मावची*
जगात थैमान घातलेल्या कोरोना वायरस चा सामना करण्या साठी नवापूर नगरीचे दोन सुपुत्र कोव्हिडं 19 चे योद्धा देशाच्या सेवेत दिवस रात्र एक करत आहेत या नवापूर शहरातील सुपुत्रानी नवापूरकरां साठी अभिमानास्पद असे कार्य केले आहे
नवापूर दत्तमंदिर शेजारी वास्तव्यास असलेले राजेंद्र कोठावदे यांचे सुपुत्र निखिल कोठावदे सेवन हिल्स मुबई येथेतर आदर्श नगर नवापूर येथे वास्तव्यास असलेले स्वप्नील मावची सफदरजंग हॉस्पिटल दिल्ली येथे सेवा देत आहेत नवापूर तालुक्यात अविरतपणे आपली सेवा देणारे डॉ उल्हास वसावे अनेक डॉक्टर ,नर्सेस हे कोरोना विषाणू चे सर्वात जास्त रुग्ण Hotspot असलेल्या ठिकाणी सेवा देत आहेत
आपल्या नवापुरकरांची मान अभिमानाने उंचावली असून आज कोरोना विषाणू ज्याने सम्पूर्ण जगाला हादरून सोडले आहे अशा रुग्णाच्या सेवेत असणाऱ्या आमच्या या योद्धा चे नवापूर चे आमदार शिरीष कुमार नाईक , नंदुरबार जिल्हा परिषद सदस्य भरत गावित नगराध्यक्षा हेमलता पाटील उपनगराध्यक्ष आरिफ बलेसरिया विरोधीपक्ष गटनेता नरेंद्र नगराळे व नगरसेवकांनी अभिनंदन करत कौतुक केले आहे
Comments
Post a Comment