मंगेश येवले @ Navapur Live अत्यावश्यक सेवे च्या नावाने आतंरराज्यीय गुटखा तस्करी आरोपी नवापुरचा असल्याने पुन्हा गुटखा तस्करी चे नवापूर कनेक्शन उघड !

आंतरराज्यीय गुटखा तस्करी सक्रीय; गुजरात पोलिसांनी केली कारवाई तीन लाखांचा मुद्दे माल जप्त लॉकडाऊन मध्ये गुजरात पोलिसांनी केलेली ही दुसरी कारवाई आहे या आधी निझर येथे जप्त केलेल्या पिकअप वाहन सोबत नवापूर स्थित रहिवासी रज्जाक अलील मेमन आरोपी मिळून आला होता आजच्या कारवाईने महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या तंबाखू जन्य पदार्थाची तस्करी जोमात असल्याचे चित्र दिसत आहे - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पण याच लॉकडाऊनचा गैरफायदा घेत नवापूर शहरातील आंतरराज्य गुटख्याची तस्करी करणारे सक्रीय झाले आहे. सध्या लाॅकडाऊन असल्याने गुटखा शौकिनांना गुटखा मिळत नसल्याचा फायदा तस्कर पाच रुपयाचे पुढी पन्नास रुपयाला विक्री करीत असल्याचे गुटख्याची सर्वत्र मागणी वाढल्याने गुटखा तस्करी सक्रीय झाली आहे. संबंधित विभागाचे अधिकारी यावर नियंत्रण मिळवणे अशक्य झाल्याचे चित्र दिसून येत आहे. गुजरात राज्यातील सोनगड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीन...