मंगेश येवले @ Navapur Live जनता पार्क मधील 55 वर्षीय पुरुषाचा तपासणी अहवाल कोरोना पोजिटिव्ह आल्याने खळबळ प्रशासन एलर्ट
आज 55 वर्षीय पुरुषाचा तपासणी अहवाल कोरोना पोजिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे
55 वर्षीय रुग्ण जिल्हारुग्णालयात उपचार घेत आहे 3 ते 4 दिवसाच्या प्रतीक्षे नंतर सदर अहवाल आल्याने 10 दिवसाच्या अंतरात शहरात दुसरा कोरोना पोजिटिव्ह रुग्णाची नोंद झाली असून नवापुरकरा साठी चिंता जनक बाब आहे
जनता पार्क परिसरातील 55 वर्षीय पुरुषाचा अहवाल रात्री उशिरा समजल्या वर प्रशासना कडून उपाय योजना करण्या साठी अधीकारी रात्रीच जनता पार्क परीसरात दाखल झाले होते
मंगलदास परिसरातील 65 वर्षीय महिला कोरोना पोजिटिव्ह आढळल्या नंतर येथील परिसर कंटेंटमेंट झोन जाहीर झाला असल्याने येथील परिसर सील करण्यात आला आहे आज सकाळी ह्याच परिसरातील संशयित दोन रुग्णांना जिल्हारुग्णालयात तपासणी साठी पाठवण्यात आल्या नंतर मंगलदास पार्क परिसरातील नागरिकांन मध्ये भीती चे वातावरण निर्माण झाले होते
सुदैवाने दोघी संशयित रुग्णांन मध्ये कोरोना सदृश्य लक्षणे नसल्याने त्यांना कोविड चाचणी करण्याची आवश्यकता नसल्याचे प्रशासना कडून सांगण्यात आले असून पुढील सात दिवसा साठी होम कोरेंनटाईन होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे
सदर दाम्पत्याने जागृत नागरिकांची भूमिका निभावत स्वतः प्रशासनाला आपल्याला लक्षणे दिसत असल्याचे सांगून तपासणी साठी पुढे आल्याने त्यांचे कौतुक होत आहे दरम्यान
कोरोना बाधित रुग्ण रहात असलेल्या ठिकाणी नगरसेवक विशाल सांगळे , सुभाष कुंभार ,तहसीलदार सुनीता जर्हाड ,गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे,पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत आरोग्य अधिकारी शशिकांत वसावे आणि पालिका प्रशासनाची आरोग्य विभागाची टीम जनता पार्क परिसरात रात्री तळ ठोकून होते कोरोना बाधित पुरुषाच्या संपर्कातील कुटुंब सदस्यांना सकाळी कोरेंनटाईन सेंटर जयहिंद छत्रालय येथे कोरेंनटाईन करण्यात आले आहे
कोरोना बाधित रुग्ण राहत असलेला परिसर कंटेंटमेंट झोन ला बेरिकेटिंग करण्यात आले आहे नागरिकांनी भीती न बाळगता सोशल डिस्टनसिंग ठेवत मास्क लावून काळजी घेण्याचे आवाहन प्रशासना कडून करण्यात आले आहे
रुग्णाचे नाव काय आहे?
ReplyDelete