Mangesh Yeole @ Navapur Live नवापूर तालुक्यात 5 वा कोरोना पोजिटिव्ह रुग्ण !
*नवापूर- तालुक्यात ५ वा कोरोना पोजिटिव्ह रुग्ण* खांडबारा येथील 38 वर्षीय पुरुषाचा अहवाल पोजिटिव्ह
नवापूर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना पोजिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या चिंतेची बाब आहे
आज सायंकाळी नंदुरबार जिल्ह्यांत तपासणी झालेल्या 81 लोकांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यात नंदुरबार 20 शहादा1 आणि नवापूर तालुक्यातिल खांडबारा गावतील 38 वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना पोजिटिव्ह असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सोशल मीडिया अकाउंट वरून माहिती प्राप्त झाली आहे
नवापूर शहरात एक महिला आणि 2 पुरुष विसरवाडी येथील पुरुष आज खांडबारा येथील 38 वर्षीय पुरुष असे एकूण 5 रुग्ण झाले आहेत दिवसेंदिवस वाढणारी कोरोना पोजिटिव्ह रुग्णाची संख्या चिंतेची बाब आहे नागरिकांनी सावध होऊन शासनाच्या नियमांचे पालन करून बाहेर गावी कार्यक्रमांना जाण्याचे टाळावे तसेच बाहेरून आलेल्या व्यक्तीची माहिती प्रशासना ला त्वरित कळवून सहकार्य करावे असे आवाहन प्रशासना कडून करण्यात येत आहे
Comments
Post a Comment