मंगेश येवले @Navapur Live नंदुरबार मध्ये कोरोनाचे अर्धशतक 40 वर्षीय अधिकारी सोबत सम्पूर्ण परिवार आणि इतर दोन एकूण 6 चे कोरोना अहवाल पोजिटिव्ह आल्याने प्रशासन हादरले !
नंदुरबार : बांधकाम विभागाचे ४० वर्षीय अधिकाऱ्यांचा अहवाल दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता़ त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यां्या कुटूंबातील सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यांना सिव्हीलमध्ये हलवण्यात येत आहे़
पॉझिटिव्ह आलेल्यात बाधित अधिकाºयांची ६८ वर्षीय आई, ४३ वर्षीय पत्नी, १५ वर्षीय मुलगी, २० वर्षाचा मुलगा यांच्यासोबत त्यांच्या संपर्कात आलेली ३१ वर्षीय महिला आणि १२ वर्षांची एक मुलगी अशा सहा लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ हे सर्व कुटूंब शहरातील पीडब्ल्यूडी क्वारटर्समध्ये निवासी होते़ त्याठिकाणी फवारणी व सॅनेटायझेशन सुरु करण्यात आले असून हा परिसर आधीच कंटेन्मेेंट झोन आहे़ सहा जणांमुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांचे अर्धशतक एकाच दिवसात पूर्ण झाले आहे़
Comments
Post a Comment