Posts

Showing posts from June, 2020

मंगेश येवले @Navapur Live मंगल कार्यालयात लग्न समारंभ साठी परवानगी मिळणार जिल्हाधिकारी नंदुरबार

Image
मंगल कार्यालयात लग्न समारंभास परवानगी नंदुरबार दि.24-खुले लॉन, विना वातानुकूलीत मंगल कार्यालय, हॉल, सभागृह किंवा घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टन्सिंगचे पालन तसेच कोविड-19 संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्नसमारंभ पार पाडण्यासासाठी नागरिकांकडून मागणी आल्यास त्यास परवानगी देण्याचे निेर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहे. उपविभागीय अधिकारी नंदुरबार, शहादा व तळोदा आणि कार्यकारी दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर नवापुर, अक्कलकुवा, अक्राणी यांनी त्यांच्यास्तरावरून ही परवानगी द्यावी आणि परवानगी दिलेल्या लग्नसमारंभाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मंगेश येवले @ Navapur Live नवापूर कोरोना अपडेट

Image
नवापूर रेल्वे स्टेशन परिसरातील 3  लोकांना कोरेनटाईन करण्यात आले असून एका 29 वय असलेल्या पुरुषाला कोरोना विषाणू  संसर्ग लक्षणे  दिसल्याने स्वेब नमुना तपासणी साठी पाठवण्यात आले आहेत सदर पुरुषाचा संपर्कातील 23 व 27 वय असलेल्या पुरुषांना खबरदारी म्हणून विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली आहे

*मंगेश येवले @Navapur Live नंदुरबार शहरात कोरोना पोजिटिव्ह रुग्णाच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक* * पुढील चार दिवस नंदुरबार शहरातील बाजार बंदनियम न पाळणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे‍ जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश*

Image
*नंदुरबार शहरात कोरोना पोजिटिव्ह रुग्णाच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक* *  पुढील चार दिवस नंदुरबार शहरातील बाजार बंद नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे‍ जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश नंदुरबार  दि. 15: कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता 19 जून 2020 च्या रात्री 12 वाजेपर्यंत नंदुरबार शहरातील बाजार व इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात यावेत. कोरोना प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात नंदुरबार शहरातील उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उप पोलीस अधिक्षक रमेश पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन.डी. बोडके, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गट विकास अधिकारी अशोक पटाईत आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, जीवनावश्यक वस्तूंच्या आस्थापना व पेट्रोल पंप सकाळी 8 ते 12 या वेळेत सुरू राहतील. ...

मंगेश येवले @Navapur Live नंदुरबार मध्ये कोरोनाचे अर्धशतक 40 वर्षीय अधिकारी सोबत सम्पूर्ण परिवार आणि इतर दोन एकूण 6 चे कोरोना अहवाल पोजिटिव्ह आल्याने प्रशासन हादरले !

Image
नंदुरबार : बांधकाम विभागाचे ४० वर्षीय अधिकाऱ्यांचा अहवाल दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता़ त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यां्या कुटूंबातील सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यांना सिव्हीलमध्ये हलवण्यात येत आहे़ पॉझिटिव्ह आलेल्यात बाधित अधिकाºयांची ६८ वर्षीय आई, ४३ वर्षीय पत्नी, १५ वर्षीय मुलगी, २० वर्षाचा मुलगा यांच्यासोबत त्यांच्या संपर्कात आलेली ३१ वर्षीय महिला आणि १२ वर्षांची एक मुलगी अशा सहा लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ हे सर्व कुटूंब शहरातील पीडब्ल्यूडी क्वारटर्समध्ये निवासी होते़ त्याठिकाणी फवारणी व सॅनेटायझेशन सुरु करण्यात आले असून हा परिसर आधीच कंटेन्मेेंट झोन आहे़ सहा जणांमुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांचे अर्धशतक एकाच दिवसात पूर्ण झाले आहे़

मंगेश येवले @Navapur Live विसरवाडी परिसरातील पोजिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील सर्व संशयित लोकांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह

Image
*नवापूर- विसरवाडी सर्व संशयिताचे तपासणी अहवाल निगेटिव्ह* विसरवाडी positive रूग्णाच्या संपर्कातील अनखी 5 लोकांचे स्वेब तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत  पत्नी,२ मुले,सासू,सासरे असे सर्वच लोकांचे कोरोना संसर्ग तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर पोजिटिव्ह असलेल्या 47 वर्षीय कोरोना पोजिटिव्ह  रुग्णाचे उपचार सुरु असल्याची माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली आहे

मंगेश येवले @Navapur Live विसरवाडी परिसरासाठी सुखद बातमी कोरोना पोजिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 6 लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह !

Image
*नवापूर - विसरवाडी साठी सुखद बातमी* विसरवाडी परिसरातील 48 वर्षीय पुरुषाचा कोरोना  पोजिटिव्ह रिपोर्ट आल्याने खळबळ उडाली होती त्याच परिसरात सदर इसम जवळ जवळ 8 लोकांच्या अधिक संपर्कात आला असल्याने प्रशासनचि चिंता वाढली होती विसरवाडी परिसर सम्पूर्ण बाजार पेठ सह अत्यावश्यक सेवाही 5 दिवस बंद करण्यात आली होती      सुदैवाने आज पोजिटिव्ह रुग्णाचा संपर्कातील  6 लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह  आल्याची माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली आहे ह्या सुखद बातमी मुळे  प्रशासना सोबत नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे

मंगेश येवले @ Navapur Live नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा शिरकाव !

Image
*नवापूर- नवापूर तालुक्यात कोरोना चा शिरकाव* *नवापूर: विसरवाडी येथील 48 वर्षीय पुरुष कोरोना पॉसिटीव्ह आढळून आला आहे. नवापूर तालुक्यात आढळून आलेलं हे तालुक्यात पहिले प्रकरण आहे. संशयित रुग्ण क्वा रंटीन करण्यात आला होता. तीन दिवस आधी त्याचा स्वाब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल आज आला. संशयित रुग्णास तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे अशी माहिती गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली असून ग्रामीण भागात कोरोना विषाणू चा शिरकाव झाल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे*

मंगेश येवले @ Navapur Live नवापूर तालुक्यतील एक पुरुष एक महिला पोजिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांची जिल्हा रुग्णालयात स्वेब तपासणी साठी रवाना !

Image
*नवापूर- नवापूर तालुक्यातील एक पुरुष एक महिला पोजिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने खळबळ*  नवापूर तालुक्यातील घोगळपाडा येथील एक पुरुष नंदुरबार येथील कोरोना संसर्ग असलेल्या  पोजिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याची माहिती मिळाली आहे  संपर्कात आलेल्या पुरुषाला जिल्हारुग्णालयात स्वेब तपासणी साठी पाठवण्यात आले असून नवापूर पंचायत समितीत कार्यरत एक ग्रामसेवीका मालेगाव येथे वास्तव्यास असलेलेल्या आपल्या पतीच्या संपर्कात आली होती ती महिला ग्रामसेवीका नवापूर येथे  सहा (6) दिवसा पासून नवापूर येथे राहत्या घरी  होमकोरेंनटाईन  करण्यात आलेले होते मालेगाव येथील त्यांच्या पतीचा स्वेब नमुना तपासणी अहवाल पोजिटिव्ह आल्याने नवापूर तालुक्यात खळबळ उडाली असून  महिलेचे स्वेब नमुना तपासणी साठी जिल्हारुग्णालयात पाठवण्यात आले आहे घरातील व्यक्तींना होमकोरेंनटाईन करण्यात आले  असल्याची माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली आहे

मंगेश येवले @ Navapur Live नंदुरबार जिल्हा साठी सुखद बातमी 9 रुग्ण कोरोना मुक्त

Image
*नवापूर-सुखद बातमी  कोरोना बाधित 9 रुग्ण कोरोना मुक्त* नंदुरबार जिल्ह्या साठी आनंदाची बातमी आज 9 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत  आज दुपारी 12 वाजता जिल्हारुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलं आहे  जिल्ह्यात आता पर्यन्त कोरोना बाधित 34 रुग्ण उपचार घेत होते त्यातील मृत्यू संख्या  3  आहे 28 कोरोना बाधित रुग्ण यशस्वी उपचारा नंतर बरे होऊन घरी गेले आहेत सध्या जिल्हारुग्णालयात फक्त 3 रुग्ण उपचार घेत आहेत 28 रुग्ण बरे झाले असल्याची माहिती  प्रशासना कडून प्राप्त झाली असून जिल्ह्यासाठी सुखद बातमी आहे