Navapur Live News @ Mangesh Yeole। नवापूर नगर परिषदे कडून दि 20 सप्टेंबर रोजी काढलेल्या आदेश नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई होणार
नवापूरमध्ये मास्क न लावल्यास दंड
नंदुरबार दि.20- नवापूर शहरातील सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल न लावल्यास 200 रुपये दंड करण्याचे निर्देश नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत.
सार्वजनिक ठिकाणी पान किंवा तंबाखूचे सेवन केल्यास 100 रुपये दंड आकारणी करण्यात येईल. सकाळी 9 ते सायंकाळी 7 या निर्धारीत वेळेव्यतिरिक्त दुकाने सुरू ठेवल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल. औषध विक्रीच्या दुकानांना यातून सूट देण्यात आली आहे. रविवारी जनता कर्फ्यु दरम्यान केवळ दूध आणि वृत्तपत्र विक्रीस सकाळी 7 ते 9 या वेळेत अनुमती असेल. इतर दुकाने सुरू राहिल्यास 1000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथ रोग प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहिता 1860 नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment