Mangesh Yeole @ Navapur Live News नंदुरबार जिल्ह्यात ऑक्सिजन बेड पुरेसे उपलब्ध- जिल्हाधिकारी
जिल्ह्यात ऑक्सिजन बेड्सची पुरेशी उपलब्धता-जिल्हाधिकारी
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 14: जिल्ह्यात ऑक्सिजन बेड्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात 200 बेड्सची सुविधा असून पाच खाजगी रुग्णालयांनादेखील कोविड उपचारासाठी मान्यता देण्यात आली आहे. यात नवापूर येथील 3 व नंदुरबार येथील दोन रुग्णालयांचा समावेश आहे. यापैकी चार रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
आज शहादा येथील दोन अन्य रुग्णालयांना कोविड उपचारासाठी मान्यता देण्यात आली आहे. या रुग्णालयात 75 बेड्स असून त्यापैकी 47 ऑक्सिजन बेड्स आहेत. जिल्ह्यातील कोविड बाधितांना योग्य उपचार मिळावे यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून नागरिकांनी घाबरून न जाता वेळेवर उपचार घ्यावेत, असे आवाहनही डॉ.भारुड यांनी केले आहे.
Comments
Post a Comment