Mangesh Yeole @ Navapur Live News आंदोलनाची दखल कामाला सुरुवात
*नवापूर- आंदोलनाची दखल काम सुरू*
नवापूर शहरातील प्रभाग क्र 1 आणि 2 मधील स्वामी समर्थ मंदिरा जवळ असलेल्या गटारी वरील कुंडी चे झाकण नसल्या मूळे कोरोना च्या ह्या माहामारीत मच्छर डास यांच्या उपद्रव दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्या चा गंभीर प्रश्न उभा राहिला होता अनेक वेळा नगर पालिका व नगरसेवकांना विनंती करून ही काम होत नसल्या मूळे शेवटी सामाजिक कार्यकर्ता मंगेश येवले यांनी भीक मांगो आंदोलनाचा इशारा दिला आला होता
आज सकाळी नगरसेविका बबिता वसावे आणि लेखाजोखाचे संपादक सुभाष कुंभार आणि कार्यालयीन निरीक्षक अनिल सोनार आणि नगर परिषद बांधकाम विभाग अभियंता सनदानशिव यांनी वेळीच आंदोलनाची दखल घेत सदर कामाची युद्ध स्तरावर कामाला सुरुवात केली असल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे दोन दिवसात काम पूर्ण करण्याची हमी नगरपरिषद प्रशासनाने दिली आहे
Comments
Post a Comment