सोशल डिस्टन चा फज्जा !

नवापूर तालुक्यात शहरात पोलीस ,महसूल ,नगरपरिषद प्रशासना कडून लॉकडाऊन झाल्या पासून नियमित सूचना देण्यात येत आहेत  कोरोना विषाणू संसर्ग ची भयानकता दिवसेंदिवस वाढतच असताना त्यातल्या त्यात महाराष्ट्रात कोरोना ची लागण झालेल्या ची संख्या वाढतच असताना नवापुरात भाजीपाला विक्रेते स्वताची जीवाची पर्वा न करता आज कोणतीही भीती नसल्या सारखे वावरताना दिसत होते शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी स्व खर्चाने नगरपरिषद आणि पोलीस निरीक्षक यांनी सोशल डिस्टन रहावे या साठी रिंगण करून दिले त्याचे कोठे ही पालन होताना दिसत नसल्याने कोरोना वायरस बाबत लोकांमधील भीती नाहीशी झाली की काय असे चित्र आज दिसून आले 
      तालुक्यात रविवार पर्यन्त 1334 लोकांना होम कोरोंटाईन केल्याची माहिती मिळाली असून अजून ही मजुरी साठी गुजरात राज्यात गेलेले मजूर आपल्या पोरा बाळा सोबत पायपीट करत आपले घर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत 
    नवापूर शहरातील धार्मिक, सामाजिक, स्वंयसेवी संघटना नेहमीच आपात कालीन स्थिती मध्ये गरजू लोकांच्या मदतीला धावून येतात आज पुन्हा नवापुरकरांनी हजारो च्या संख्येने येत असलेल्या मजूर लोकांना जेवणाची व वाहनाची सोय करून माणुसकीचे दर्शन दाखवले तर शहरातील देवलफळी लहान चिंचपाडा भागातील मोल मजुरी करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या ची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तेथील स्थानिक नगरसेवक विश्वास बडोगे जे नेहमीच आपल्या  जयमहाकाल बहुउद्देशीय संस्थेच्या मार्फत आरोग्य सुविधा देतातच परंतु ह्या करतात लॉकडाऊन झाल्या पासून येथील मजूर वर्गावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून अगदि लॉकडाऊन झाल्या पासून लोकांच्या जेवणाची असो किंवा आरोग्याची काळजी घेताना दिसत आहे प्रत्येक घराघरात शिदा पोचवत असून मास्क हात धुण्यासाठी साबण वगैरे देण्याचे काम करत असल्याने नवापूर शहरातील लोकां कडून सोशमीडिया च्या माध्यमातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे

Comments

Popular posts from this blog

नवापूर-सोलापूर हुन आलेल्या 11लोकांना केले कोरेनटाईन

गुजरात पोलिसांची कारवाई नवापुरचे तीन अटक 9लाखाच्या मुद्देमाल जप्त (विमल गुटखा तमाखू आणि वाहन)

Mangesh Yeole @ Navapur Live News 27/07/2020