नंदुरबार जिल्ह्यात 16 पैकी 15 रुग्ण निगेटिव्ह

कोरोना विषाणूची लागण झालेली आहे किंवा नाही याची खात्री व्हावी म्हणून आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवण्यात आलेल्या म्हणजे क्वारंटाईन केलेल्या 16 जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. अबुदाबी, फ्रान्स, दुबई व अन्य विदेश वाऱ्या करून आलेल्यांचा यात समावेश आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून  दिलेल्या माहितीत  म्हटले आहे की 16 पैकी 15 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आहेत. एक व्यक्ती वेगळ्या आजारासाठी दाखल झाला आहे. केवळ त्याच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का असल्याने त्याला आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतचे सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत. सुखद बातमी असली तरी
शहरातील तालुक्यातिल नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आमदार शिरीष नाईक ,उद्योगपती विपींभाई चोखावला यांनी केले आहे 
आज  नवापूर शहरात आज शनिवार आठवडे बाजारात भाजीपाला विक्रेत्यांनी सोशल डिस्टन ठेवले नसल्या मुळे गर्दी दिसून आली नगर पालिकेच्या कर्मचार्यां कडून नियमित सूचना देऊन ही विक्रेते जागे मध्ये अंतर ठेवत नसल्या आज नगर सेवक रस्त्यावर उतरलेले दिसून आले 
  स्वामी विवेकानंद चौकातील नागरिकांनी संतप्त होत येथील बाजार हटवनायची मागणी आमच्या प्रतिनिधींशी बोलून दाखवली
       गुजरात राज्यात मजुरी साठी गेलेल्या मजुरांची संख्या आता थोडी फार कमी होत आहे नवापूर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी माणुसकीचे दर्शन दाखवत मजुरा साठी जेवण व सोबत शिदा ही दिला गावाकडे जाण्या साठी वाहनांची व्यवस्था ही करून दिलेली आहे

Comments

Popular posts from this blog

नवापूर-सोलापूर हुन आलेल्या 11लोकांना केले कोरेनटाईन

गुजरात पोलिसांची कारवाई नवापुरचे तीन अटक 9लाखाच्या मुद्देमाल जप्त (विमल गुटखा तमाखू आणि वाहन)

Mangesh Yeole @ Navapur Live News 27/07/2020