Posts

Navapur Live News @ Mangesh Yeole। नवापूर नगर परिषदे कडून दि 20 सप्टेंबर रोजी काढलेल्या आदेश नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई होणार

Image
नवापूरमध्ये मास्क न लावल्यास दंड नंदुरबार दि.20- नवापूर शहरातील सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी चेहऱ्यावर मास्क  किंवा रुमाल न लावल्यास 200 रुपये दंड करण्याचे निर्देश नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी  पान किंवा तंबाखूचे सेवन केल्यास 100 रुपये दंड आकारणी करण्यात येईल. सकाळी 9 ते सायंकाळी 7 या निर्धारीत वेळेव्यतिरिक्त दुकाने सुरू ठेवल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल. औषध विक्रीच्या दुकानांना यातून सूट देण्यात आली आहे. रविवारी जनता कर्फ्यु दरम्यान केवळ दूध आणि वृत्तपत्र विक्रीस सकाळी 7 ते 9 या वेळेत अनुमती असेल. इतर दुकाने सुरू राहिल्यास 1000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ केल्यास आपत्ती  व्यवस्थापन कायदा, साथ रोग प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहिता 1860 नुसार  कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. ---

Navapur Live News @ mangesh Yeole माझे कुटुंब माझी जवाबदारी चला तर जवाबदारी स्वीकारूया !

Image
चला जबाबदारी स्विकारूया! कोविड-19 रुग्णांमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेता या आजाराचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जनतेचा सहभाग आवश्यक आहे. यासाठी राज्यभरात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील शहर, गाव, पाडे-वस्त्या आणि तांड्यातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. मोहिमेचा शुभारंभ 15 सप्टेंबर रोजी करण्यात आला.  गृहभेटीसाठी जिल्ह्यात 482 पथके तयार करण्यात आली असून 3 लाख 78 हजार घरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे.  प्रत्येक पथकात एक आरोग्य कर्मचारी आणि 2 स्वयंसेवक असतील. हे स्वयंसेवक स्थानिक सरपंच किंवा नगरसेवक निश्चित करतील.  प्रत्येक पथक एक दिवसात 50 घरांना भेट देईल. 5 ते 10 पथकामागे एक डॉक्टराची नेमणूक करण्यात आली आहे. पथकासोबत इल्फ्रारेड थर्मामीटर, पल्स ऑक्सीमीटर, सॅनिटायझार देण्यात येणार आहे. घरातील व्यक्तींचे तापमान आणि ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्यात येऊन त्याची नोंद घेण्यात येईल. ताप 100.4 फॅरनहाईट (38 डिग्री से.) किंवा जास्त असल्यास किंवा ऑक्सिजनचे प्रमाण 95 टक्क्यापेक्षा कमी अस...

Navapur Live News @ mangesh Yeole। माझे कुटुंब माझी जवाबदारी मोहीम शुभारंभ

Image
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ’ मोहिमेचा विभागीय आयुक्ताच्या हस्ते शुभांरभ नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि.15:   नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ’ या नंदुरबार जिल्हास्तरीय मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आदी उपस्थित होते. श्री.गमे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार या मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. मोहिमेच्या माध्यामातून ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरीक व अतिजोखमीच्या व्यक्तींची माहिती घेण्यात येणार आहे. नागरिकांनी आरोग्य पथकाला योग्य माहिती द्यावी आणि आरोग्य तपासणीसाठी सहकार्य करावे. कोरोनासाठी प्रशासनातर्फे अनेक उपाययोजना करण्यात येत असल्या तरी कोरोना होऊच नये यासाठीचे नियोजन आवश्यक आहे. त्यादृष्टीने ही व्यापक मोहिम हाती घेण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधासाठी घ्य...

Mangesh Yeole @ Navapur Live News नंदुरबार जिल्ह्यात ऑक्सिजन बेड पुरेसे उपलब्ध- जिल्हाधिकारी

Image
जिल्ह्यात ऑक्सिजन बेड्सची पुरेशी उपलब्धता-जिल्हाधिकारी नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 14: जिल्ह्यात ऑक्सिजन बेड्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात 200 बेड्सची सुविधा असून पाच खाजगी रुग्णालयांनादेखील कोविड उपचारासाठी मान्यता देण्यात आली आहे. यात नवापूर येथील 3 व नंदुरबार येथील दोन रुग्णालयांचा समावेश आहे. यापैकी चार रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.  आज शहादा येथील दोन अन्य रुग्णालयांना कोविड उपचारासाठी मान्यता देण्यात आली आहे. या रुग्णालयात 75 बेड्स असून त्यापैकी 47 ऑक्सिजन बेड्स आहेत. जिल्ह्यातील कोविड बाधितांना योग्य उपचार मिळावे यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून नागरिकांनी घाबरून न जाता वेळेवर उपचार घ्यावेत, असे आवाहनही डॉ.भारुड यांनी केले आहे. 00000

Mangesh Yeole @ Navapur Live News जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांचा मोठा निर्णय कोरोना विषाणू बाधित लक्षणे नसलेल्या व्यक्ती ला गृह अलगिकरणास परवानगी

Image
कोरोना विषाणू बाधित लक्षणे नसणाऱ्या गृह अलगीकरणास मुभा : जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र  भारुड नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि.20: जिल्ह्यातील नागरीकांना गृह अलगीकरणात राहण्यास काही अटी व शर्तीच्या अधिन राहून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यानी अनुमती दिली आहे.  जिल्ह्यात कोविड-19 विषाणू बाधित रुग्ण आढळून येत असून संसर्ग झाल्यानंतर विलगीकरण  व अलगीकरण करण्यात येत असल्याने लक्षणे नसताना शासकीय अलगीकरण व विलगीकरण कक्षात राहावे लागत असल्याने  नागरीक कोविडची चाचणी करुन घेत नाही. त्यामुळे नागरिकांनी सौम्य लक्षणे असल्यास किंवा कोविड बाधिताच्या संपर्कात आल्यास  चाचणी वेळेवर करून घ्यावी यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे. गृह अलगीकरणासाठी रुग्णांची पात्रता वैद्यकीय पडताळणीअंती लक्षणे नसणाऱ्या बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकिय अधिकाऱ्याने प्रमाणीत केल्यास गृह अलगीकरणास अनुमती देण्यात येईल. त्यासाठी रुग्णांच्या घरामध्ये स्वतंत्र स्नानगृह व शौचालयाची सुविधा उपलब्ध असावी व संपर्कात येणाऱ्या परिवारासाठी विलगीकरणाची पुरेशी सुविधा असावयास हवी. रोग प्रतिकार...

Mangesh Yeole@ Navapur Live News। सौम्य लक्षण असलेल्या कोरोना बाधित रुग्ण आपल्या घरात सोय असल्यास उपचार घेऊ शकणार जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड

Image
सौम्य लक्षणे असलेल्या बाधितांसाठी गृह अलगीकरण सुविधा-जिल्हाधिकारी नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 19- कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सौम्य लक्षणे असलेल्या बाधिताची इच्छा असल्यास आणि त्याच्या निवासस्थानी योग्य सुविधा असतील तर त्यांना गृहअलगीकरणात ठेवण्यास अनुमती देण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. कोरोनाबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. डॉ.भारुड म्हणाले, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी यासाठी नियमावली तयार करावी. गृहअलगीकरणापूर्वी आरोग्य पथकाने बाधिताच्या घरी आवश्यक सुविधा असल्याची खात्री करून घ्यावी. त्याच्या घरच्यांना आवश्यक सूचना देण्यात याव्यात. अलगीकरणासाठी घरात पुरेशी जागा असल्याची खात्री करून घ्यावी. गृहअलगीकरण ही ऐच्छिक बाब असेल. गृहअलगीकरणापूर्वी संबंधितांकडून त्याची इच्छा असल्याबाबत लेखी निवेदन घ्यावे. तालुक्याच्या यंत्रणेने बाधिताच्या संपर्कातील अधिक आणि कमी जोखमीच्या सर्व व्यक्तिंचे स्वॅब तातडीने घ्यावेत. तळोदा आणि नवापूरच्या टीमने याबाबत विशेष दक्षता घ्यावी. बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आवश्यक सुवि...

Mangesh Yeole @ Navapur Live News आंदोलनाची दखल कामाला सुरुवात

Image
*नवापूर- आंदोलनाची दखल काम सुरू* नवापूर शहरातील प्रभाग क्र 1 आणि 2 मधील स्वामी समर्थ मंदिरा जवळ असलेल्या गटारी वरील कुंडी चे झाकण नसल्या मूळे  कोरोना च्या ह्या माहामारीत मच्छर डास यांच्या उपद्रव दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्या चा गंभीर प्रश्न उभा राहिला होता अनेक वेळा नगर पालिका व नगरसेवकांना विनंती करून ही काम होत नसल्या मूळे शेवटी सामाजिक कार्यकर्ता मंगेश येवले यांनी भीक मांगो आंदोलनाचा इशारा दिला आला होता     आज सकाळी नगरसेविका बबिता वसावे आणि लेखाजोखाचे संपादक सुभाष कुंभार आणि कार्यालयीन निरीक्षक अनिल सोनार आणि नगर परिषद बांधकाम विभाग अभियंता सनदानशिव यांनी वेळीच आंदोलनाची दखल घेत सदर कामाची युद्ध स्तरावर कामाला सुरुवात केली असल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे दोन दिवसात काम पूर्ण करण्याची हमी नगरपरिषद प्रशासनाने दिली आहे