Mangesh Yeole @ Navapur Live News जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांचा मोठा निर्णय कोरोना विषाणू बाधित लक्षणे नसलेल्या व्यक्ती ला गृह अलगिकरणास परवानगी

कोरोना विषाणू बाधित लक्षणे नसणाऱ्या गृह अलगीकरणास मुभा : जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि.20: जिल्ह्यातील नागरीकांना गृह अलगीकरणात राहण्यास काही अटी व शर्तीच्या अधिन राहून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यानी अनुमती दिली आहे. जिल्ह्यात कोविड-19 विषाणू बाधित रुग्ण आढळून येत असून संसर्ग झाल्यानंतर विलगीकरण व अलगीकरण करण्यात येत असल्याने लक्षणे नसताना शासकीय अलगीकरण व विलगीकरण कक्षात राहावे लागत असल्याने नागरीक कोविडची चाचणी करुन घेत नाही. त्यामुळे नागरिकांनी सौम्य लक्षणे असल्यास किंवा कोविड बाधिताच्या संपर्कात आल्यास चाचणी वेळेवर करून घ्यावी यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे. गृह अलगीकरणासाठी रुग्णांची पात्रता वैद्यकीय पडताळणीअंती लक्षणे नसणाऱ्या बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकिय अधिकाऱ्याने प्रमाणीत केल्यास गृह अलगीकरणास अनुमती देण्यात येईल. त्यासाठी रुग्णांच्या घरामध्ये स्वतंत्र स्नानगृह व शौचालयाची सुविधा उपलब्ध असावी व संपर्कात येणाऱ्या परिवारासाठी विलगीकरणाची पुरेशी सुविधा असावयास हवी. रोग प्रतिकार...