Posts

Showing posts from March, 2020

,भाजीपाला बाजार स्थलांतरित होणार

Image
https://youtu.be/R-7Gn_t9fqs *नवापूर-*NLN च्या बातमीची दखल भाजीपाला बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात भरणार*   कोरोना विषाणू च्या संसर्गामुळे सम्पूर्ण जग हादरल असतांना नवापूर शहरात मात्र भाजीपाला आठवडे  बाजार भर वस्तीत भरवला गेल्याने स्वामी विवेकानंद चौकातील नागरिक संतप्त झाले होते जिल्हा परिषद सदस्य भरत गावित यांनी सदर बाजार इतरत्र हलवण्या बाबत प्रशासनास विनंती केली होती         नवापूर लाईव्ह चेंनल च्या माध्यमातून आठवडे बाजारातील गर्दी कोरोना विषाणू संसर्ग  साठी धोका दायक असल्याचे दाखवन्यात आले होते   ह्या गर्दी मुळे भाजीपाला बाजार स्थानिक  लोकांच्या आरोग्या चा प्रश्न निर्माण होणार याची  अधिकाऱयांना  शास्वती होताच प्रशासनाने दखल घेतली   आमदार शिरीष नाईक यांनी स्थानिक लोकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेत नगरसेवकांना  बोलावून  बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती च्या आवाराची  जागा उपलब्ध करून देतो  असल्याचे सांगितले      आज सकाळी आमदार शिरीष नाईक नवापूर नगर परिषदे चे नगरसे...

आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची मास्क , ग्लोज नसताना सेवा

Image
*नवापूर- आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून करत आहेत सेवा* नवापूर तालुक्यात आरोग्य सेवकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे नवापूर तालुक्यात 45+45 च्या तीन  टीम तयार केलेल्या असून त्यात जवळ जवळ 400 अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक ,ग्रामसेवक नर्सेस असे एकूण हजारो च्या संख्ये कर्मचारी आपली सेवा देण्याचे काम करत आहेत        सम्पूर्ण जगाला हादरून सोडलेल्या ह्या कोरोना वायरस चा सामना करण्या साठी गटविकास अधिकारी यांच्या निगराणीत सम्पूर्ण तालुक्यात घरोघरी होम कोरोंटाईन झालेल्या लोकांवर निगराणी ठेवणे परराज्यातून आलेल्या मजुरांची आरोग्य तपासणी करणे नियमित ही कामे ही सम्पूर्ण टीम करत आहे         अयोग्य सेवा देणाऱ्या ह्या सेवकांना सुरक्षे साठी लागणारे साहित्य प्रशासना कडून वेळोवेळी पुरवले पाहिजे परंतु प्रशासना कडून साहित्य दिले जात नसल्याचे निदर्शनात आले आहे      जीवघेण्या ह्या वायरस चा मुकाबला करण्या साठी सम्पूर्ण यंत्रणा झटत आहे परंतु त्या  साठी लागणारे यंत्र उपलब्धच नसल्याचे बोलले जात आहे त्या मुळे हजारोच्या संख्येने आरोग्य सेवा देणाऱ्या ह...

सोशल डिस्टन चा फज्जा !

Image
नवापूर तालुक्यात शहरात पोलीस ,महसूल ,नगरपरिषद प्रशासना कडून लॉकडाऊन झाल्या पासून नियमित सूचना देण्यात येत आहेत  कोरोना विषाणू संसर्ग ची भयानकता दिवसेंदिवस वाढतच असताना त्यातल्या त्यात महाराष्ट्रात कोरोना ची लागण झालेल्या ची संख्या वाढतच असताना नवापुरात भाजीपाला विक्रेते स्वताची जीवाची पर्वा न करता आज कोणतीही भीती नसल्या सारखे वावरताना दिसत होते शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी स्व खर्चाने नगरपरिषद आणि पोलीस निरीक्षक यांनी सोशल डिस्टन रहावे या साठी रिंगण करून दिले त्याचे कोठे ही पालन होताना दिसत नसल्याने कोरोना वायरस बाबत लोकांमधील भीती नाहीशी झाली की काय असे चित्र आज दिसून आले        तालुक्यात रविवार पर्यन्त 1334 लोकांना होम कोरोंटाईन केल्याची माहिती मिळाली असून अजून ही मजुरी साठी गुजरात राज्यात गेलेले मजूर आपल्या पोरा बाळा सोबत पायपीट करत आपले घर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत      नवापूर शहरातील धार्मिक, सामाजिक, स्वंयसेवी संघटना नेहमीच आपात कालीन स्थिती मध्ये गरजू लोकांच्या मदतीला धावून येतात आज पुन्हा नवापुरकरांनी हजारो...

भाजीपाला बाजार ची जागा बदलणार !

Image
नवापूर शहरात स्वामी विवेकानंद चौक मधील नागरिकांनी आणि जी. प सदस्य श्री भरतभाउ गावीत यांनी कोरोना चा पार्श्र्वभूमीवर शहरातील डॉ बाबासाहेब रोड वरील मध्यवर्ती ठिकाणी भरत आसलेला भाजी पाला बाजार तात्पूरत्या स्वरुपात मोकळ्या मैदानात भरविण्या विषय चे निवेदन तहसीलदार सो यांना दिले होते सध्या ज्या ठिकाणी भाजी पाला विक्रेते आपला व्यवसाय करीत आहेत तेथे रहीवाशी क्षेत्र आसून बाजारात होणारी गर्दी लक्षात घेता खबरदारी म्हणून सदर बाजार हा मोकळ्या जागेवर स्थलांतरित करण्यात यावा अशी सूचना केली होती त्या अनूषंघाने तहसीलदार सौ सूनीता जऱ्हाड यांनी आज कृषी बाजार समितीच्या मैदानाची पहाणी करून भाजी पाला व्यवसायीकाचा व नागरीकांचा आरोग्याचा दृष्टीने ही जागा योग्य असल्याचे सांगितले त्या प्रमाणे त्यांनी नगर पालिका कार्यालयीण व्यवस्थापक अनिल सोनार व नगरसेवकांशी चर्चा केली बाजार समितीच्या दोघ शेड मधे साधारण १००व्यवसायीकांची व्यवस्था होउ शकते उर्वरीत व्यवसायीकाना श्री शिवाजी हायस्कूल च्या पंटागणात स्थलांतरित करण्यात येईल

नंदुरबार जिल्ह्यात 16 पैकी 15 रुग्ण निगेटिव्ह

Image
कोरोना विषाणूची लागण झालेली आहे किंवा नाही याची खात्री व्हावी म्हणून आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवण्यात आलेल्या म्हणजे क्वारंटाईन केलेल्या 16 जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. अबुदाबी, फ्रान्स, दुबई व अन्य विदेश वाऱ्या करून आलेल्यांचा यात समावेश आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून  दिलेल्या माहितीत  म्हटले आहे की 16 पैकी 15 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आहेत. एक व्यक्ती वेगळ्या आजारासाठी दाखल झाला आहे. केवळ त्याच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का असल्याने त्याला आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतचे सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत. सुखद बातमी असली तरी शहरातील तालुक्यातिल नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आमदार शिरीष नाईक ,उद्योगपती विपींभाई चोखावला यांनी केले आहे  आज  नवापूर शहरात आज शनिवार आठवडे बाजारात भाजीपाला विक्रेत्यांनी सोशल डिस्टन ठेवले नसल्या मुळे गर्दी दिसून आली नगर पालिकेच्या कर्मचार्यां कडून नियमित सूचना देऊन ही विक्रेते जागे मध्ये अंतर ठेवत नसल्या आज नगर सेवक रस्त्यावर उतरलेले दिसून आले  ...